कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून आता उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झपाट्याने काम करत आहेत आणि मैदानात उतरले आहेत.
काँग्रेस पक्षाने काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांना विश्वासात घेऊन निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. काँग्रेस पक्षाकडून डिजिटल सभासद नोंदणीच्या कार्यक्रमाकरिता कार्यकर्त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर कामाला लागावे असे आदेश बंटी पाटलांनी दिलेले आहेत.
सतेज पाटील, हसन मुश्रिफांपाठोपाठ आता आमदार राजेश पाटीलही जिल्हा बँकेत बिनविरोध
कोल्हापुरातील प्रत्येक तालुक्यातील १०० टक्के डिजिटल सभासद नोंदणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. काही ठिकाणी आपण स्वबळावर तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांना सोबत घेऊन निवडणुका लढवणार आहोत असं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. या वेळी आमदार ऋृतुराज पाटील, आमदार राजू आवळे, गुलाबराव घोरपडे,गोकुळचे संचालक बयाजी शेळके आदी उपस्थित होते.
५४ दिवसांपासून चालेलला संप अखेर मागे; लाल परी पुन्हा एकदा धावणार रस्त्यावर
काँग्रेसच्या डिजिटल सभासद नोंदणीसाठी एका महिन्यात जिल्ह्यातील सर्व समित्यांच्या सर्व नियुक्त्या कराव्यात असं सांगण्यात आलं आहे. या तत्वानुसार पक्षवाढीसाठी नवीन सभासदांची नोंदणी करून प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा.
कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीतील मंत्र्याला रोखण्यासाठी राजू शेट्टी मैदानात!
जिल्ह्यातील जिल्हा परिषदांसाठी प्रारूप आराखडा तयार होऊन अंतिम आरक्षण लवकरच जाहीर होणार आहे. या प्रक्रियेसाठी काही महिन्यांचा वेळ असला तरी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. काँग्रेसला बळकट करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांची एकजूट करण्यासोबत नवीन सदस्यांची नोंदणी आवश्यक आहे. काँग्रेसची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोचायला हवीत, असे पाटील यांनी सांगितले.