पुणे : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अनेक मोठमोठे निर्णय घेतले जात आहेत. काल रात्री राज्य पोलिस दलातील तब्बल 30 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह विभागाने केल्या आहेत. यामद्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची देखील बदली करण्यात आली आहे. पुण्यात सीआयडी प्रमुख आणि अप्पर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांची पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची आता मुंबई येथे अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था याठिकाणी बदली करण्यात आली आहे.
शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय…! पिंपरी-चिंचवडकरांसाठी केले तब्बल ९९५ कोटी मंजुर
मुंबईतील सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची देखील आता बदली करण्यात आली असून त्यांची आता मुंबई येथे अप्पर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक येथे नियुक्ती करण्यात आली आहे. याठिकाणी याअगोदर विनय कुमार चौबे म्हणून होते. त्यांची आता पिंपरी चिंचवड याठिकाणी पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
“हिवाळी अधिवेशन सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू व्हावे”; अजित पवारांची मागणी
तर अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांना आता अपर पोलीस आयुक्त , सशस्त्र पोलीस बृहमुंबई येथे जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांची बदली गुन्हे अन्वेषण विभाग येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 19 डिसेंबरपासून
पिंपरी चिंचवड शहाराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक शहर पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर नागपुर शहाराचे अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची अमरावती शहर पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
Read also
- शिंदे-फडणवीस सरकार उद्या मंत्र्यांना घेऊन दिल्ली जाण्याची शक्यता..!
- फडणवीसांची जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू..! मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे-फडणवीसांचे मोठे निर्णय
- चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याची अन् पत्रकाराची हत्तीवरून मिरवणुक काढणार
- “पुण्यातील मुक मोर्चानंतर उदयन राजे खासदारकीचा राजीनामा द्यायला दिल्लीला”
- “साहेबांना जीवे मारण्याची धमकी तर अदखलपात्र गुन्हा, अन् पाटलांवर शाई फेक, खुनाचा प्रयत्न”