पुणे : महापुरूषांचा अपमान केल्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे एका व्यक्तीने शाई फेक केली. याप्रकरणावरून शाई फेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 11 पोलिसांचं निलंबण देखील करण्यात आलं. तर एका पत्रकाराला अटक देखील करण्यात आलं. यातच आता शाई फेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस देण्यात येणार असून डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाने देखील मोठा निर्णय घेतला आहे.
“महापुरूषांचा अवमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असा इशारा आज पुणेकरांनी भाजप-शिंदे सरकारला दिला”
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकणाऱ्या मनोज गरबडे व त्याचे छात्राचित्रण करणारे पत्रकार गोविंद वाकडे यांची हत्तीवरून मिरवणुक काढण्याचा डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाने सांगलीत घेतला आहे. याआधी बारामती चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याला 51 हजारांंचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.
“नुफुर शर्माच्याबाबत जो निर्णय घेण्यात आला, मग आता का नाही?” उदयन राजेंचा केंद्र सरकारला सवाल
महापुरूषांचा अपमान केल्याने चंद्रकांत पाटलांच्या विरोधात राज्यातील राजकीय पक्षांनी कडाडून टिका केली होती. पिंपरी येथील शाई फेक प्रकरणाआधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे राष्ट्रवादीचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून जो कोणी चंद्रकांत पाटील यांना काळे फासवण्याचे काम करेल. त्याला 51 हजार रूपयांचे बक्षीस दिले जाईल, असे चिथावणीखोर भाषण सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
ठाकरे-शिंदेंच्या न्यायालयातील याचिकांची सुनावणी आणखी लांबणीवर
त्यातच आता ज्या आरोपीने मंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केली आहे. त्या आरोपीला एक लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतणे राजरत्न आंबेडकर यांनी तशी घोषणी केली असून त्याचा सत्कारही करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Read also
- “पुण्यातील मुक मोर्चानंतर उदयन राजे खासदारकीचा राजीनामा द्यायला दिल्लीला”
- “साहेबांना जीवे मारण्याची धमकी तर अदखलपात्र गुन्हा, अन् पाटलांवर शाई फेक, खुनाचा प्रयत्न”
- शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय…! पिंपरी-चिंचवडकरांसाठी केले तब्बल ९९५ कोटी मंजुर
- “हिवाळी अधिवेशन सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू व्हावे”; अजित पवारांची मागणी
- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 19 डिसेंबरपासून