पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांविषयी भाजप आणि शिंदे गटाचे नेते अवमान कारक बेताल वक्तव्य करत आहे. या विरोधात आज पुणेकरांनी बंदची हाक दिली आणि शहरात कडकडीत बंद पाळला गेला. महापुरूषांचा अवमान हा महाराष्ट्र खपवून घेणार नाही असा इशारा आज पुणेकरांनी भाजप-शिंदे सरकारला दिला. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी दिली आहे.
पुण्यातल्या मोर्चात उदयन राजे सहभागी…! तर मनसे-भाजपच्या नेत्यांनी फिरवली पाठ
मागील काहि दिवसापासून राज्यात वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरू आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांची अलिकडील काळात वादग्रस्त व्यक्तव्य चर्चेत आलीत. त्यातच राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत पुणे बंद ची आज हाक दिली होती.
पुण्यात लॉकडाऊन सारखी पुन्हा परिस्थिती..! राजकीय पक्षांकडून पुणे बंदची हाक
पुणे बंदच्या मोर्चात भाजपचे खासदार उदयन राजे यांनी देखील सहभाग घेतला होता. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून लक्ष्मी रोड, असा लाल महाल येथे या मुक मोर्चाचा शेवट झाला. या मोर्चात राज्यातील अनेक संघटनांनी सहभाग घेतला. तर 40 मुस्लिम संघटनांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला.
Read also
- “नुफुर शर्माच्याबाबत जो निर्णय घेण्यात आला, मग आता का नाही?” उदयन राजेंचा केंद्र सरकारला सवाल
- ठाकरे-शिंदेंच्या न्यायालयातील याचिकांची सुनावणी आणखी लांबणीवर
- काल दोन ‘दादा’ भिडले अन् आज मंत्रालयाच्या बैठकीत एकमेकांच्याच बाजुलाच बसले
- “आज पुणे, तर उद्या संपुर्ण महाराष्ट्र बंद होईल”, संजय राऊतांचा इशारा
- मोठी बातमी…! शरद पवारांना जीवे ठार मारण्याची धमकी, सिल्व्हर ओकवर धमकीचा फोन