मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आज धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर एका अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबईतील गावदेवी पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्यावर शाई फेक केल्याने संबंधित व्यक्तीवर खुनाचा आरोप लावण्यात आला होता. यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टोला हाणला आहे.
ठाकरे-शिंदेंच्या न्यायालयातील याचिकांची सुनावणी आणखी लांबणीवर
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या भूमिकेमुळे शरद पवारांना धमकीचा फोन आल्याचा सांगितलं जात आहे. याप्रकरणाबाबत पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरूवात केली आहे. फोनवरून धमकी देणारा व्यक्ती हिंदीतून बोलत होता. शरद पवारांचा कालच वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर त्यांची करण्याबाबत धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे. त्या व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल दोन ‘दादा’ भिडले अन् आज मंत्रालयाच्या बैठकीत एकमेकांच्याच बाजुलाच बसले
यावरूनच जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. पवार साहेबांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने संबंधित व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटलांवर फेकलेली शाई प्रकरणानंतर खुनाचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर अनेक कलम लावण्यात आल्याचं आव्हाडांनी सांगितलं.
पवार साहेबांना जिवे मारण्याची धमकी… अदखलपात्र गुन्हा
चंद्रकांत पाटलांवर फेकलेली शाई… खुनाचा प्रयत्न
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 13, 2022
Read also
- शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय…! पिंपरी-चिंचवडकरांसाठी केले तब्बल ९९५ कोटी मंजुर
- “हिवाळी अधिवेशन सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू व्हावे”; अजित पवारांची मागणी
- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 19 डिसेंबरपासून
- “महापुरूषांचा अवमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असा इशारा आज पुणेकरांनी भाजप-शिंदे सरकारला दिला”
- “नुफुर शर्माच्याबाबत जो निर्णय घेण्यात आला, मग आता का नाही?” उदयन राजेंचा केंद्र सरकारला सवाल