ठाणे : प्रेयसीसोबत झालेल्या वादातून अश्वजीत गायकवाड या तरूणाने अंगावर कार घालून चिरडत तिला गंभीर जखमी केल्याची घटना घोडबंदर रोडवरील ओवळा भागात घडली आहे. प्रिया सिंगे असे तिचे नाव आहे. विशेष म्हणजे हा पालघर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाने शिंदे सरकारवर टिका केली आहे.
हेही वाचा..सुप्रिया सुळेंचं लोकसभेतून निलंबन; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
सध्या संपुर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारांना चांगले दिवस आले आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता, गुन्हेगारांना पाठीशी घालणारंच हे सरकार असल्याचं स्पष्ट होतंय. मागच्या आठवड्यातील ठाण्यातील महिलेवर गाडी घालण्याची घटना असेल किंवा कालची महिलेवर बलात्कार करून फेकून देण्याची घटना असेल. सरकार ढिम्म झालंय. आताच्या गृहमंत्र्यांच्या कारभाराला गुन्हेगार एकतर घाबरत नाहीत किंवा त्यांना राजकीय संरक्षण तरी दिलं जातंय. असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.
हेही वाचा…“तुरूंगवास पत्करावा लागला तरी माफी मागणार नाही,” सुषमा अंधारेंचं उपसभापतींना संस्कृतमध्ये पत्र
दरम्यान, ठाण्याच्या घटनेत तर सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता होता, त्याला इतक्या गंभीर गुन्ह्यात जामिनदेखील मिळाला.. अशाप्रकारे ढिला कारभार गृहमंत्रालय करणार असेल, तर गृहमंत्री केवळ मोठ्या बाता मारतात का? मुंबईची तर ही ओळख नाहीच! देशातील महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित शहर हीच ओळख मुंबईची होती, आहे… आणि राहिली पाहिजे! ती ओळख पुसण्याचं काम ह्या मिंधे सरकारच्या काळात होतंय आणि त्यांना ह्यात यशदेखील मिळतंय! असं अवसान घातकी सरकार म्हणजे, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे! अशी टिका देखील ठाकरे गटाने केलीय.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गन्हेगारांना चांगले दिवस आले आहेत.
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता, गुन्हेगारांना पाठीशी घालणारंच हे सरकार असल्याचं स्पष्ट होतंय.
मागच्या आठवड्यातील ठाण्यातील महिलेवर गाडी घालण्याची घटना असेल किंवा कालची महिलेवर बलात्कार करुन फेकून… pic.twitter.com/At4jUP5Fnp
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 23, 2023
READ ALSO :
हेही वाचा..पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या सभांच्या दिवशी शाळा बंद ठेवल्या जात नाहीत, मग जरांगेंच्या सभांवेळी का? छगन भुजबळांचा सवाल
हेही वाचा…शरद पवारांची साथ द्यायला नातू मैदानात, पवार कुटुंबीयातील आणखी एक व्यक्ती राजकारणात
हेही वाचा…“कुठेही मॅच फिक्सिंग नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो,” अजित दादांच्या या वक्तव्याचा काॅंग्रेसने घेतला समाचार
हेही वाचा…अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार? ‘या’ खासदाराचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हे शेतकऱ्यांसाठी मैदानात, ‘या’ मागण्यांसाठी चार दिवस आंदोलन करणार