पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटाची आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी काळाती निवडणुका तसेच पक्ष बळकट करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यातच या बैठकीत अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. कुठेही मॅच फिक्सिंग नाही. आमच्यासोबत आलेल्यांना फसवणार नाही. हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यावरून आता काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी अजित पवारांना खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…अटक होताच प्रकृती बिघडली, आमदारकीही जाणार ? काॅंग्रेसचे माजी मंत्री ‘सुनील केदार’ मोठ्या संकटात
अजित पवार गटाच्या झालेल्या बैठकीत अजित पवार म्हणाले की, भेटीगाठी कौटूंबिक आहेत. कुठेही मॅच फिक्सिंग नाही. आमच्यासोबत आलेल्यांना फसवणार नाही. माझ्या भूमिकेत कुठेही बदल होणार नाही, हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. यातच कमळाच्या चिन्हावर आपण लढणार नाही, घड्याळावरच महायुतीत लढणार असं देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केलीय.
हेही वाचा…मोठी बातमी…! रोहित पवारांचं फेसबुक अकाउंट हॅक, समर्थकांचा फडणवीसांकडे बोट
दरम्यान, स्टॅंम्पपेपर डुल्पिकेट देखील मिळतात. तो जुन्या तारखेचा आहे किंवा दुसऱ्याच्या नावावर आहे, असेही सांगता येते. नंतर ती माझी सहीच नाही, असे म्हणण्याची बनवाबनवी शिंदे गटाच्या आमदारांनी शिकवलीच आहे. हे सगळे करूनही जमले नाही तर मग स्व.यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहेच. आत्मक्लेश करायला. त्यापश्चात देखील पत्रकारांनी प्रश्न विचारले तर एक मिनिट एक मिनिट म्हणून दरडावण्याची क्लृप्ती आम्ही अगोदरच आत्मसात केली आहे. नाही का ? असं म्हणत सचिन सावंत यांनी अजित पवारांना डिवचलंय.
READ ALSO :
हेही वाचा…अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार? ‘या’ खासदाराचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हे शेतकऱ्यांसाठी मैदानात, ‘या’ मागण्यांसाठी चार दिवस आंदोलन करणार
हेही वाचा..सुप्रिया सुळेंचं लोकसभेतून निलंबन; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…“तुरूंगवास पत्करावा लागला तरी माफी मागणार नाही,” सुषमा अंधारेंचं उपसभापतींना संस्कृतमध्ये पत्र
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश, आघाडी अन् अपक्षाचे ५० माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल