ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित काल राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवकर हारून खान आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका ज्योती हारून खान यांनी ठाणे शहारातील किसन नगर २ येथील शिवसेना शाखेत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा…शिंदे गटाचा वर, ठाकरे गटाची वधू..! ठाण्यात अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा, मुख्यमंत्र्यांसह ठाकरे गटाचे नेते उपस्थित
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, हारून खान यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या आधीही पाच मुस्लीम नगरसेवक शिवसेनेवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष असे मिळून ही संख्या ५० नगरसेवकांच्या वर गेली आहे. मुंबई महानगरपालिकेत आपला दवाखाना असो, किंवा सध्या सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हजार टँकर्सच्या माध्यमातून एक दिवसाआड मुंबईतील रस्ते स्वच्छ करून धुतले जात आहेत. मी स्वतः या अभियानात सहभागी होऊन पालिका अधिकाऱ्यांकडून हे काम करून घेत आहे. पावसाळ्यात स्वतः नालेसफाईची पाहणी केल्याने यंदा रस्त्यावर पाणी साचल्याच्या फारशा तक्रारी आल्या नाहीत.
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आले एकत्र, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
दरम्यान, तुमच्या परिसरातील रुग्णालय असो किंवा रखडलेले एसआरएचे प्रकल्प असो ते शासनाच्या वतीने सर्व यंत्रणा एकत्र आणून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असून मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले. यानंतर त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने किसन नगर-२ परिसरात तयार करण्यात आलेल्या श्री समर्थ वाहनतळाचे लोकार्पण केले. या एलिव्हेटेड पार्किंग वाहनतळामुळे शहरातील या दाटीवाटीने वसलेल्या परिसरात येणाऱ्या वाहनांना पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक हारून खान आणि त्यांचा पत्नी माजी नगरसेविका ज्योती हारुन खान यांनी आज ठाणे शहरातील किसन नगर २ येथील #शिवसेना शाखेत उपस्थित राहून त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करून… pic.twitter.com/XvzHkPg2E5
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अटक होताच प्रकृती बिघडली, आमदारकीही जाणार ? काॅंग्रेसचे माजी मंत्री ‘सुनील केदार’ मोठ्या संकटात
हेही वाचा…मोठी बातमी…! रोहित पवारांचं फेसबुक अकाउंट हॅक, समर्थकांचा फडणवीसांकडे बोट
हेही वाचा..“आता पुरे झाली मन की बात, आता हवी जन की बात”, शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे मैदानात उतरणार
हेही वाचा…“जर रामराज्य आणायचं असेल तर भ्रष्टाचारामुक्त महाराष्ट्र घडवावा लागेल”, आदित्य ठाकरेंचं विधान
हेही वाचा…“कुठेही मॅच फिक्सिंग नाही, कुणालाही फसवणार नाही”, कार्यकर्त्यांना अजित पवारांनी दिला हा शब्द