पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटाची आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी काळाती निवडणुका तसेच पक्ष बळकट करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यातच या बैठकीत अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान निवडीबाबत त्यांनी मोदींना पसंती दिली असून माझ्या सोबत आलेल्या लोकांना धोका देणार नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे याची चर्चा आता सुरू झाली आहे.
हेही वाचा..शिंदेंचा ठाकरेंना पहिला दणका, सुजीत पाटकरांची १२ कोटी संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई
अजित पवार गटाच्या झालेल्या बैठकीत अजित पवार म्हणाले की, भेटीगाठी कौटूंबिक आहेत. कुठेही मॅच फिक्सिंग नाही. आमच्यासोबत आलेल्यांना फसवणार नाही. माझ्या भूमिकेत कुठेही बदल होणार नाही, हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. यातच कमळाच्या चिन्हावर आपण लढणार नाही, घड्याळावरच महायुतीत लढणार असं देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केलीय.
हेही वाचा…धुळ्याचा गड कोण जिंकणार ? भाजपसमोर काॅंग्रेसचं कडवं आव्हान, ठाकरेंचीही साथ मिळणार
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावर बोलतांना थोडी काळजी घ्या. अशा सूचना देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच आरक्षण दिलं पाहिजे असं बोला. कायद्यानुसार आरक्षण सर्वांना मिळालं पाहिजे. बोलतांना गैरसमज निर्माण करू नका. कोणतीही चर्चा काम करताना मित्र पक्षांना इजा होणार नाही असं विधान करू नका. मार्च महिन्यात आचारसंहिता लागेल, संघटनात्मक काम करा. असंही अजित पवारांनी सांगितलं. तसेच इंडिया आघाडीचे खर्गे आणि मोदींमध्ये फार मोठा फरक आहे. यातून खर्गे आणि मोदींमधून जनता मोदींनाच निवडेल. असा विश्वास व्यक्त करत धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी विचार हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे. ही विचारधारा सोडायची नाही. त्यासाठी कोणतीही किमंत मोजावी लागली तरी चालेल. असंही त्यांनी म्हटलं. तसेच जेष्ठांवर आपल्याला टीका करायची नाही. पण कोणी आपल्या नेत्यांवर बोललं तर जशास तसं उत्तर द्या. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा.शिंदे गटाचा वर, ठाकरे गटाची वधू..! ठाण्यात अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा, मुख्यमंत्र्यांसह ठाकरे गटाचे नेते उपस्थित
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आले एकत्र, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचाउपराष्ट्रपतींची नक्कल..! नितीन गडकरींनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह विरोधकांना दिल्या कानपिचक्या
हेही वाचा…राष्ट्रवादीचे आमदार अपात्र होणार ? अजित पवार यांना दणका बसणार ?
हेही वाचा…“विरोधकांच्या १४१ खासदारांना बाहेर ठेऊन मोठी चुक केली, किमंत चुकवावी लागणार,” शरद पवारांचा दिल्लीतून हल्लाबोल