धुळे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांनी आपापल्या मतदारसंघाची बांधणी करण्यास सुरूवात केली आहे. यातच आता धुळे लोकसभा मतदारसंघात भाजप विरूद्ध काॅंग्रेस अशी पुन्हा लढत होण्याची शक्यता आहे. यातच पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवणार असं विधान काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी केलं आहे. त्यामुळे धुळ्यात लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार सुभाष भामरे विरूद्ध श्याम सनेर अशी लढत होणार का ? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…“संविधान पदावर निर्जीवर बाहुल्यांचा खेळ सुरू”,उपराष्ट्रपतींवर सामानातून जहरी टिका
धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. यामध्ये धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामिण तसेच शिंदखेडा तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य, तसेच बागलाण या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये मालेगाव बाह्य मतदारसंघात मंत्री दादा भूसे, एकनाथ शिंदे गट, मालेगाव शहर मौलाना मुक्ती एमआयएम, बागलाण मध्ये दिलीप बोरसे भाजप, धुळे शहर, फारूक शाह एमआयएम, धुळे ग्रामीण कुणाल पाटील काॅंग्रेस, शिंदखेडामध्ये माजी मंत्री जयकुमार रावल भाजप विद्यमान आमदार आहेत.
हेही वाचा…“२४ तारीख अल्टिमेटम देऊ नका, अडचण आहे, पण आम्ही मार्ग काढू”, जरांगे सोबतची चर्चा निष्फळ
धुळे लोकसभा मतदारसंघातून काॅंग्रेस पक्षातर्फे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, श्यामकांत सनेर, डॉ. तुषार शेवाळे यांची नावे आघाडीवर आहेत. तर भाजपकडून खासदार डॉ सुभाष भामरे यांच्यासह आमदार अमरीश पटेल यांची नावे चर्चेत आली आहे. या मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. २०१९ मध्ये त्यांना ६,१३,५३३ मत तर काॅंग्रेसचे कुणाल पाटील यांना ३,८४,२९० मते मिळाली होती. उर्वरित सोळा उमेदवारांची अनामत जप्त झाली होती. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नबी अहमद दुल्ला यांना ३९,४४४ मते मिळाली होती. तर याच मतदारसंघात प्रतापदादा सोनवणे आणि विद्यमान खासदार भामरे २०१४ आणि २०१९ असे सलग तीन वेळा भाजपकडे हा मतदारसंघ राहिला आहे.
हेही वाचा…“कामापेक्षा शायनिंग जास्त, VIP मुळे जनता त्रस्त!” ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या उद्घाटनावरून ठाकरेंची टिका
धुळे लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीकडून काॅंग्रेसने दावा सांगितला आहे. त्यामुळे ही जागा काॅंग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना ३, ८४,२९० मतं पडली होती. म्हणजे जवळपास तीन लाखांनी पराभव झाला होता. परंतु यावेळी महाविकास आघाडीत ठाकरे गटांसह राष्ट्रवादीचा शरद पवार गट देखील असणार आहे. सोबतच वंचित आली तर भाजपचा याठिकाणी काम तमाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, धुळे लोकसभा निवडणुकीत विजयासाठी जात हा फॅक्टर यशस्वी होत नाही. या मतदारसंघात मराठा समाज हा ३० ते ३५ टक्के असून उर्वरित समाजाची संख्या मराठा समाजाच्या तुलनेनं अधिक आहे. यात काही मुस्लिम मतंही मोठ्या प्रमाणात आहेत. धुळे लोकसभा मतदार संघात नाशिक जिल्ह्यातील बागलाणची मते निर्णायक ठरली आहे. विकासाच्या मुद्यावरच धुळे लोकसभा मतदार संघाची आजवरची निवडणूक झालीय.
READ ALSO :
हेही वाचा…“३ टन खिचडी, ट्रकभर केळी अन् चार लाख पाण्याच्या बाटल्या,” जरांगे पाटलांच्या सभेची जय्यत तयारी
हेही वाचा…काॅंग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात कोर्टानं ठरवलं दोषी
हेही वाचा…राज्यात ठाकरे गट लोकसभेच्या ‘या’ २३ जागा लढविणार ; काॅंग्रेस हायकमांडसोबत झाली चर्चा
हेही वाचा..पुण्यातील भाजपचे आमदार धास्तावले, ! रिपोर्ट कार्डमुळे झाली पंचाईत, गोंधळ, धाकधुक वाढली
हेही वाचा…बारामतीत ओबीसी कार्ड खेळण्याचा भाजपचा प्रयत्न ; सुळेंच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या व्यक्तीला दिली मोठी जबाबदारी