नागपूर : काॅंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या १५० कोटी रूपयांच्या घोटाळा प्रकरणी केदार यांना दोषी ठरवलं आहे. कोर्टानं सुनील केदार यांच्यासह सहा जाणांना दोषी जाहीर केले आहे. सध्या कोर्टात शिक्षेच्या प्रमाणावर युक्तिवाद सुरू असून सहा दोषींचे वकील युक्तिवाद करत आहेत. यामुळे आता नागपूरात काॅंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“कामापेक्षा शायनिंग जास्त, VIP मुळे जनता त्रस्त!” ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या उद्घाटनावरून ठाकरेंची टिका
२००२ मधील नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल आज लागणार आहे. यामध्ये काॅंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह केतन शेठ, अशोक चौधरी, अमित वर्मा, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी यांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. २००२ मध्ये १५० कोटींहून अधिक रूपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा सुनील केदार बॅंकेचे अध्यक्ष होते, ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा असून पुढे खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बॅकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते.
हेही वाचा..विरोधी पक्षातील १४३ खासदार निलंबित, आता राहुल गांधींनाही आली नोटीस, काय आहे प्रकरण ?
दरम्यान, २००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचूरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विेसस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बॅंकेच्या रकमेतून सरकारी रोखे खरेदी केले होते. मात्र, पुढे या कंपन्यांकडून कधीच बॅंकेला खरेदी केलेले रोख मिळाले नाही. ते बॅंकेच्या नावाने झाले नव्हते. धक्कादायक म्हणजे पुढे रोखे खरेदी करणाऱ्या या खाजगी कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या. सुनील केदार हे लोकप्रतिनिधी , त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी असा सुनील केदार यांच्या वकिलांचा युक्तवाद कोर्टात सुरू आहे. इतर आरोपींचे वकील एक एक करून युक्तिवाद करत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यात ठाकरे गट लोकसभेच्या ‘या’ २३ जागा लढविणार ; काॅंग्रेस हायकमांडसोबत झाली चर्चा
हेही वाचा..पुण्यातील भाजपचे आमदार धास्तावले, ! रिपोर्ट कार्डमुळे झाली पंचाईत, गोंधळ, धाकधुक वाढली
हेही वाचा…बारामतीत ओबीसी कार्ड खेळण्याचा भाजपचा प्रयत्न ; सुळेंच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या व्यक्तीला दिली मोठी जबाबदारी
हेही वाचा…“संविधान पदावर निर्जीवर बाहुल्यांचा खेळ सुरू”,उपराष्ट्रपतींवर सामानातून जहरी टिका
हेही वाचा…“२४ तारीख अल्टिमेटम देऊ नका, अडचण आहे, पण आम्ही मार्ग काढू”, जरांगे सोबतची चर्चा निष्फळ