जालना : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी दिलेली मुदत संपत आली आहे. त्यामुळे ही मुदत आणखी वाढवून देण्यात यावी, यासाठी सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला पोहचलं आहे. यावेळी सरकारच्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटलांसोबत तब्बल एक तासांहून अधिक तास चर्चा केली. परंतु २४ तारखेवर मनोज जरांगे पाटील ठाम राहिलेत. त्यावर यात थोडी अडचण आहे. पण आम्ही मार्ग काढू, असं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
हेही वाचा…“देशातील जनता सगळं पाहतेय, सरकारला याची किंमत मोजावी लागेल”; शरद पवारांना मोदींना इशारा
सरकारच्या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, संदीपान भूमरे आणि उदय सामंत जरांगे पाटलांच्या भेटीला पोहचले आहेत. मनोज जरांगे पाटील हे सगे सोयरे कोण ? या एकाच मुद्यावर शिष्टमंडळासोबत चर्चा करत आहेत. कायद्यात रक्ताचे नातेवाईक बसतात तेवढे ग्राह्य धरू असे मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी सांगितले. त्यावर जरांगे पाटील सरसगटला तुम्ही पर्यायी शब्द द्या म्हणाले होते असे म्हणाले. तज्ज्ञांनी माझे शब्द लिहून घेतले होते. तुमच्याकडून होत नसेल तर स्पष्ट सांगा असेही ते म्हणाले.
हेही वाचा…“आता थुकरट विश्वप्रवक्त्यांनी सगळ्या झालेल्या आरोपांसाठी..”संजय राऊतांवर शिंदे गटाचा हल्लाबोल
विधान सभेचे सत्र काल संपले. चार दिवस चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उत्तर दिले. मागासवर्ग आयोग नेमला. साधनसंपत्ती दिली आहे. मराठा आरक्षण द्यायचे आहे. ज्या क्युरी काढल्या आहेत. त्या दूर करू. सरकार सकारात्मक आहेत. अंतिम टप्यात आरक्षण आलंय. २४ तारीख अल्टिमेटम देऊ नका. माझी पत्नी, तिचा भाऊ असे सर्टिफिकेट मिळावे. पण तसे नियमात बसत नाहीत. वडील असतात त्याचे रक्त वंशावळी त्यांनाच प्रमाणपत्र मिळेल. यात थोडी अडचण आहे पण आम्ही मार्ग काढू. अस गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
दरम्यान, तुमचे लोक विचारतात सल्ला कोणाचा ? स्किप्ट कोणाची. इथे सर्व समाज म्हणून मी लढत आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचा सल्ला घेतला नाही. तुमचे ऐकून मी त्यांच्याबद्दल बोलणे सोडले आहे. माझ्याकडे येणारे सर्व तज्ञ होते. त्यांना माझा शब्द कळला नाही का ? सगे सोयरे कळले नाही असे होणार नाही. तुम्ही शब्द दिला म्हणून उपोषण सोडले. पण आता विचार करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“कामापेक्षा शायनिंग जास्त, VIP मुळे जनता त्रस्त!” ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या उद्घाटनावरून ठाकरेंची टिका
हेही वाचाविरोधी पक्षातील १४३ खासदार निलंबित, आता राहुल गांधींनाही आली नोटीस, काय आहे प्रकरण ?
हेही वाचा…“उपराष्ट्रपतींच्या अवमानाच्या निषेधार्थ कोल्हापुरात भाजपाची निदर्शने”,भाजपचे कार्यकर्ते आक्रमक
हेही वाचा…“तुम्ही शब्द दिला म्हणून उपोषण सोडले पण आता..,”मनोज जरांगे पाटील भूमिकेवर ठाम
हेही वाचा…मुंबईत ३८ वर्षीय तरूणाचा ६४ वर्षीय महिलेवर ब’ला’त्का’र”, महिला आयोगाने आरोपीवर कारवाई करण्याचे दिले आदेश