मुंबई : मुंबईतील विकासकामांवरून मागील काही दिवसापासून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. यातच धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात ठाकरे गटाने मुंबईत भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चातून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यातच आता मुंबईतील काही विकासकामांच्या उद्घाटनाचा मुहर्त कधी लागणार? असा सवाल करत शिंदे सरकारवर जोरदार टिका केलीय.
हेही वाचा…“आता थुकरट विश्वप्रवक्त्यांनी सगळ्या झालेल्या आरोपांसाठी..”संजय राऊतांवर शिंदे गटाचा हल्लाबोल
ठाकरे गटाने ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, शिवडी ते न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या उद्घाटनाचा मुहर्त कधी लागणार? असा सवाल ठाकरेंनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात १५ जानेवारी २०२० रोजी पहिला गर्डर झाला. प्रकल्पाला वेग आला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणीि मंत्री आदित्य ठाकरे यांनी सातत्याने पुलाच्या कामाचा पाठपुरावा केला. बैठका घेतल्या. नियोजन केले. कोविड काळातही पुलाचे काम वेगाने सुरू राहिले.
हेही वाचा…रामाचा बाजार मांडलाय, राम कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही; कुणी केली टीका ?
दरम्यान, गद्दारीमुळे महाविकास आघाडीचे सरकार पडेपर्यंत जुन २०२२ पर्यंत ८५ टक्के काम पुर्ण झाले होते. त्यानंतर उरलेल्या १५ टक्के कामासाठी घटनाबाह्य सरकारने दीड वर्षाचा वेळ घेतला. आता काम पुर्ण होऊन दोन महिन्यापेक्षा जास्त वेळ होऊन गेला आहे. पण व्हीआयपी मिळत नाही म्हणून उद्घाटन रखडलंय. म्हणूनच कामापेक्षा शायनिंग जास्त असून व्हीआयपीमुळे जनता त्रस्त झाली आहे. असं म्हणत ठाकरे गटाने टिका केली आहे.
कामापेक्षा शायनिंग जास्त,
VIP मुळे जनता त्रस्त! pic.twitter.com/45UbrLIPEO— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 21, 2023
READ ALSO :
हेही वाचाविरोधी पक्षातील १४३ खासदार निलंबित, आता राहुल गांधींनाही आली नोटीस, काय आहे प्रकरण ?
हेही वाचा…“उपराष्ट्रपतींच्या अवमानाच्या निषेधार्थ कोल्हापुरात भाजपाची निदर्शने”,भाजपचे कार्यकर्ते आक्रमक
हेही वाचा…“तुम्ही शब्द दिला म्हणून उपोषण सोडले पण आता..,”मनोज जरांगे पाटील भूमिकेवर ठाम
हेही वाचा…मुंबईत ३८ वर्षीय तरूणाचा ६४ वर्षीय महिलेवर ब’ला’त्का’र”, महिला आयोगाने आरोपीवर कारवाई करण्याचे दिले आदेश
हेही वाचा…“देशातील जनता सगळं पाहतेय, सरकारला याची किंमत मोजावी लागेल”; शरद पवारांना मोदींना इशारा