मुंबई : राज्यात मागील काही वर्षापासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. यातच चेंबूर मधील घरकाम व मासेविक्री करणाऱ्या ६८ वर्षीय महिलेवर ३८ वर्षीय तरूणाे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द येथे घडली आहे. याप्रकरणाची माहिती लागताच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ रूग्णालयात महिलेची प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी रूग्णालयात धावल्या आहेत. तसेच संबंधित आरोपीवर कारवाई करण्याचीही मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यावर आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिसांना पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा…“सावलीसारखे कार्यकर्ते सोडून गेलेत हे कळलं नाही, पण..,”अजित पवार गटाचा आव्हाडांना खोचक टोला
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत चेंबूर येथील घटनेची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, वयाचेही भान न ठेवता मातेसमान स्त्रीलाही उपभोगाची वस्तू मानत केवळ आपल्या शारीरिक हव्यासापोटी एका ६४ वर्षीय महिलेवर ३८ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द इथे घडलीय. घरी सोडतो असे खोटे सांगून उमेश ढोके नावाचा हा नराधम चेंबूर मधील घरकाम व मासेविक्री करणाऱ्या त्या महिलेला मानखुर्द येथील आपल्या राहत्या घरी घेऊन गेला. रात्रभर तिच्यावर बलात्कार करत, नंतर मारहाण करत पहाटे घराबाहेर विवस्त्र अवस्थेत त्याने तिला फेकून दिले. या घटनेबाबत कळताच पोलिसांनी घटनास्थळी जात पीड़ित महिलेला उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर आरोपी ढोकेलाही तासाभरातच अटक करून त्याची चौकशी सुरू केली. त्यात त्याने गुन्ह्याचीही कबुली दिली असल्याने लगेचच त्याच्यावर बलात्कार- मारहाण संबंधित कलमांतर्गत ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा…“मुंबईतील सर्वाधिक टेंडरबाजी करणारे आज मुख्यमंत्र्यांच्या..,” राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, आज राजावाडी मी व माझी माझी सहकारी आशा मराठे हॉस्पिटलमध्ये जाऊन या प्रकरणातील पीडित महिलेची व तिच्या परीवाराची भेट घेतली. आज पहाटेच पिडीतेला हॉस्पिटल ला दाखल केल्याने अजुन दोन दिवसांनी पुन्हा एकदा तिच्याशी बोलून आणखी काही म्हणण तिच असेल तर त्याची नोंद घेतली जावी तसेच मनोधैर्य योजनेसाठीच्या कागदपत्रांची पुर्तता पोलिसांनी लवकर करून संबंधित विभागात पाठवावी ही विनंतीही पोलिसांना केली. पोलिसांनी ॲक्शन घेत ज्या तत्परतेने आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला. तितक्याच जलद गतीने कारवाई होत. त्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा होईल, हे नक्की ! कारण, महिलांची सुरक्षितता ही प्राथमिकता मानणारे आमचे संवेदनशील सरकार अशा घटनांकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही.
दरम्यान, रूपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की, मुंबईत एका ६४ वर्षीय वृद्ध महिलेवर ३८ वर्षाच्या तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणी पोलिसांना तातडीने पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबईत एका ६४ वर्षीय वृद्ध महिलेवर ३८ वर्षाच्या तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणी पोलिसांना तातडीने पुढील कारवाई… pic.twitter.com/FCZ3Uf2qQ7
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) December 21, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“देशातील जनता सगळं पाहतेय, सरकारला याची किंमत मोजावी लागेल”; शरद पवारांना मोदींना इशारा
हेही वाचा…“आता थुकरट विश्वप्रवक्त्यांनी सगळ्या झालेल्या आरोपांसाठी..”संजय राऊतांवर शिंदे गटाचा हल्लाबोल
हेही वाचा…रामाचा बाजार मांडलाय, राम कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही; कुणी केली टीका ?
हेही वाचा…निवडणूक आयुक्तांची नियुक्ती येणार सरकारच्या हाती ; संसदेत महत्वाचं विधेयक मंजूर
हेही वाचा…“अराजकता माजवणारे ३ कायदे पारित करायचे आहे म्हणून विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन”