नागपूर : नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपुरमध्ये भाजप-आरएसएस यांची एक वैचारीक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत. ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून आव्हाडांना डिवचलं आहे.
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ युवा नेत्याने केली आत्महत्या ; आत्महत्या की घातपात संशय ? पुण्यात एकच खळबळ
सावलीसारखे सोबत असलेले कार्यकर्ते सोडून गेले हे त्यांना कळलं नाही, पण संघ आणि भाजपच्या बैठकीत काय घडलं हे त्यांना समजलं. ? असा शाब्दिक टोला अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला. तसेच हल्ली इतक्या अंतर्गत गोटात शिरलेत याचं कौतूक वाटते. असं म्हणत येरिश्ता बडतारहे असा हॅशटॅग देखील मिटकरी यांनी ट्विटवर केला आहे.
हेही वाचा…“आम्ही अदाणीला घाबरत नाही, भविष्यातही रस्त्यावर उतरून संघर्ष करू”, वर्षा गायकवाड कडाडल्या
जितेंद्र आव्हाड यांनी पुढे असंही म्हटलं की, ज्यांना राजकारण समजते, ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणुक लढवायची आहे. त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी, महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही. अशी शक्यता देखील जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर आता शिंदे आणि अजित पवार गट काय प्रत्युत्तर देणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, महायुतीतील काही खासदारांनी भाजपच्या कमळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असा दावा देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावरून शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. यातच लोकसभा नाही परंतु विधानसभा निवडणुका ह्या भाजपच्याच तिकीटावर लढवल्या जातील आणि भाजप स्वबळावर लढवणार. तसेच ज्यांना यायचं त्यांनी यावं, नाही तर त्यांना बाहेर काढलं जाईल. असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
सावली सारखे सोबत असलेले कार्यकर्ते सोडून गेले हे त्यांना कळलं नाही, पण संघ आणि भाजपच्या बैठकीत काय घडलं हे त्यांना समजलं.हल्ली इतक्या अंतर्गत गोटात शिरलेत याचं कौतुक वाटते. #येरिश्ताबढतारहे…😄
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 21, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मुंबईतील सर्वाधिक टेंडरबाजी करणारे आज मुख्यमंत्र्यांच्या..,” राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनात १७ पैकी १२ विधेयके मंजूर ; मराठा आरक्षणावर तब्बल ३ दिवस चर्चा,” मुख्यमंत्र्यांची माहिती
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनात १७ पैकी १२ मंजूर विधेयके मंजूर ; मराठा आरक्षणावर तब्बल ३ दिवस चर्चा,” मुख्यमंत्र्यांची माहिती
हेही वाचा…भाजपचं ठरलंय..! शिंदे आणि अजित पवार कमळावर निवडणुका लढवणार; माजी मंत्र्यांचा मोठा दावा
हेही वाचा…सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रं देण्याचा वेग वाढवला, आतापर्यंत ‘इतके’ प्रमाणपत्राचं वाटप