पुणे : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली तारिख जवळ येत आहे. तशी राजकीय घडामोड सुरू झाली आहे. सरकारने मराठा आरक्षणाबाबत फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तर २४ तारखेवर जरांगे पाटील ठाम आहेत. यामुळे आता सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्याचा वेग आता वाढवला आहे.
हेही वाचा…निवडणुकीआधी इंडिया आघाडीत बिघाडी; जागावाटपावरून काॅंग्रेस, तृणमूल काॅंग्रेस आणि आप आमनेसामने
आतापर्यंत मराठवाड्यात आतापर्यंत ३ हजार जणांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. साडेपाच लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्रे मिळण्याचा अंदाज आहे. १ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत ३ हजार ४६२ प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. मराठवाड्यात २ कोटी कागदपत्रांच्या आधारे २७ हजार कुणबी नोंदी शोधण्यात आल्या. एक नोंदीच्या आधारे तब्बल २० जणांना कुणबी प्रमाणपत्रे मिळणार आहेत.
हेही वाचा…“शाळा बंद झाल्या आणि बिअरचा खप १२ टक्क्यांनी वाढला”
दरम्यान, उपविभागीय कार्यालयात कुणबी प्रमाणपत्रे वाटण्याचे निरंतर काम सुरू आहे. सर्वाधिक बीड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तर सर्वात कमी परभणी जिल्ह्यात ३७ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ युवा नेत्याने केली आत्महत्या ; आत्महत्या की घातपात संशय ? पुण्यात एकच खळबळ
हेही वाचा…“आम्ही अदाणीला घाबरत नाही, भविष्यातही रस्त्यावर उतरून संघर्ष करू”, वर्षा गायकवाड कडाडल्या
हेही वाचा…“आदित्य राजाच्या कृपने वरूण राजानं अक्षर:श टेंडरचा पाऊस पाडला” ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“मराठा आंदोलनादरम्यान शासनाने किती गुन्हे मागे घेतले?” फडणवीसांना सांगितला आकडा
हेही वाचा…“बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना असे म्हणायचे, आता उबाठावाले कुत्तासोबत नाचतात,” शिंदे गटाचा हल्लाबोल