मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी सभागृहात १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर पार्ट्या करत असल्याचा आरोप केला होता. त्यावरून आता ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. यावरून ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटावर जोरदार टिका केली आहे. त्यामुळे हा वाद आणखी आता चिघळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“देवाच्या देवळात कोट्यावधीचा भ्रष्टाचार,” शनिशिंगणापूर संस्थानचं ऑडिट होणार, शिंदे-फडणवीसांची मोठी घोषणा
बाळासाहेबांच्या माध्यमातून वाघाशी नातं जोडलं जात होतं, मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील लोक सलीमच्या माध्यमातून कुत्याशी नातं जोडत आहेत. एकेकाळी आपला सिनेमा इतका स्वाभिमानी होता की बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना असे म्हणायचे, पण हा सुधाकर बडगुजर त्याच कुत्तासोबत डान्स करतोय. असा हल्लाबोल शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटावर चढवला आहे.
हेही वाचा…“बाळासाहेबांना विचारलं तर कमरेत लाथ बसेल”, भरत गोगावलेंचं वादग्रस्त विधान, दानवेंनी घेतला समाचार
दरम्यान, शिवसेना भवनच्या बाहेर बॉम्बस्फोट करून बाळासाहेबांचा जीव घेण्याचा ज्यांचा कट होता, त्या सलीम कुत्तासाठी बडगुजर यांनी आपल्या फार्म हाऊसवट पार्टी ठेवली. असा घणाघात देखील त्यांनी चढवला. सुषमा अक्का दहशतवाद्यांचा समर्थन करण्यासाठी पुढे येतात का ? त्यांच्याकडे पुरावे असतील तर तपास यंत्रणाना द्यावे, मात्र केवळ मोट्या व्यक्तींवरती टिका करून प्रसिद्धीच्या झोतात राहणे हे आता चालणार नाही. असही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…निवडणुकीआधी इंडिया आघाडीत बिघाडी; जागावाटपावरून काॅंग्रेस, तृणमूल काॅंग्रेस आणि आप आमनेसामने
हेही वाचा…“शाळा बंद झाल्या आणि बिअरचा खप १२ टक्क्यांनी वाढला”
हेही वाचा…मराठा आरक्षण लांबणीवर, रात्री एकनाथ शिंदेंचा फोन, मनोज जरांगे पाटील म्हणाले..
हेही वाचा…“शारीरिक हव्यासापोटी ३८ वर्षीय नराधमाचा ६४ वर्षीय महिलेवर ब’ला’त्का’र”, चित्रा वाघ महिलेसाठी रूग्णालयात धावल्या
हेही वाचा…“शिंदेंना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाही”, माजी मुख्यमंत्र्यांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप