जालना : राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात आपला अहवाल सादर करेल, त्यानंतर त्याचे अवलोकन केले जाईल. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येईल. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली आहे. परंतु २४ डिसेंबरपर्यंतच्या अल्टिमेटमवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यावर रात्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं.
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा विषय फेब्रुवारीपर्यंत लांबला ; विशेष अधिवेशन होणार, जरांगे पाटलांनी सरकारला दिला इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जे अधिवेशनात मांडलं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी साथ दिली. त्याबद्दल मराठा समाजाने कौतूक केलं आहे. २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला १०० टक्के न्याय मिळेल. परंतु स्पष्टता हवी. त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. एवढं मोठं आरक्षण दिलं आणि यात खुटी ठेवली तर त्या आरक्षणाचा फायदा होणार नाही. मुख्यंत्री यांच्या वतीने रात्री फोन आला होता आणि ते जे विषय राहिले आहेत. त्याबाबत स्पष्टता करू असे म्हणाले असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय.
हेही वाचा…“तर 2024 ला मी मुख्यमंत्री होऊ शकतो”, बच्चू कडूंच्या दाव्याने अनेकांची उडाली भंबेरी
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मी जाहिरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तसं वचन दिलं आहे आणि आजही मी त्यावर ठाम आहे. मराठा समाजाशिवाय इतर कोणताही समाज अडचणीत राहिला असता तर मी अशीच शपथ घेतली असती, त्यामुळे मी कुठेही मागे हटणार नाही, अशी ग्वाही पुन्हा एकदा देतो. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी जे-जे काही करायचं आहे, ते सगळं करण्याची आमची तयारी आहे. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शारीरिक हव्यासापोटी ३८ वर्षीय नराधमाचा ६४ वर्षीय महिलेवर ब’ला’त्का’र”, चित्रा वाघ महिलेसाठी रूग्णालयात धावल्या
हेही वाचा…“शिंदेंना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाही”, माजी मुख्यमंत्र्यांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
हेही वाचा…“देवाच्या देवळात कोट्यावधीचा भ्रष्टाचार,” शनिशिंगणापूर संस्थानचं ऑडिट होणार, शिंदे-फडणवीसांची मोठी घोषणा
हेही वाचा…“बाळासाहेबांना विचारलं तर कमरेत लाथ बसेल”, भरत गोगावलेंचं वादग्रस्त विधान, दानवेंनी घेतला समाचार
हेही वाचा…भाजपच्या एका खासदाराला वाचवण्यासाठी १४१ खासदार निलंबित”