नागपूर : राज्यात बिअरच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढ झाली असून शासनाला विक्रीच्या उत्पादन शुल्कापोटी २ हजार ३४ कोटींचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्यातील बिअरच्या दराबाबत शासनाने नेमलेल्या समितीबद्दल सत्यजीत तांबे यांनी तारांकित प्रश्न केला होता. याच्या लेखी उत्तरात देसाई यांनी ही माहिती दिली आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मंत्र्यांवर जहरी टिका केलीय.
हेही वाचा…भाजपच्या एका खासदाराला वाचवण्यासाठी १४१ खासदार निलंबित”
शिंदे-फडणवीस-पवार सरकारने शेवटी करून दाखविले. शिक्षण बंद- दारू सुरू. यानुसार जिल्हा परिषदांच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. अन् दुसरीकडे दारूचा खप वाढविण्यासाठी उपाययोजना केली. शाळा बंद झाल्या आणि बिअरचा खप १२ टक्क्यांनी वाढला. अशी जोरदार टिका रोहिणी खडसे यांनी केली आहे. तसेच स्वत: मंत्री महोदयांनीच हे जाहीर केलं आहे. मानलं राज्यकर्त्यांना.. असा खोचक टोमणाही त्यांनी सरकारला हाणला.
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा विषय फेब्रुवारीपर्यंत लांबला ; विशेष अधिवेशन होणार, जरांगे पाटलांनी सरकारला दिला इशारा
दरम्यान, राज्यातील बिअरबाबतच्या धोरणांचा अभ्यास करून महसुल वाढीच्या दृष्टीने १९ ऑक्टोंबरच्या निर्णयानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. अमरावती, नागपूर व नांदेड विभागात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत बिअर विक्रित कुठलीही घट झाली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे जाहीर अभिनंदन! शेवटी तुम्ही करुन दाखविले…
शिक्षण बंद- दारु सुरु यानुसार जिल्हा परिषदांच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. अन् दुसरीकडे दारुचा खप वाढविण्यासाठी उपाययोजना केली. शाळा बंद झाल्या आणि बियरचा खप 12 टक्क्यांनी वाढला. स्वत: मंत्रीमहोदयांनीच… pic.twitter.com/KKMQY5Zur2— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) December 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षण लांबणीवर, रात्री एकनाथ शिंदेंचा फोन, मनोज जरांगे पाटील म्हणाले..
हेही वाचा…“शारीरिक हव्यासापोटी ३८ वर्षीय नराधमाचा ६४ वर्षीय महिलेवर ब’ला’त्का’र”, चित्रा वाघ महिलेसाठी रूग्णालयात धावल्या
हेही वाचा…“शिंदेंना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाही”, माजी मुख्यमंत्र्यांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
हेही वाचा…“देवाच्या देवळात कोट्यावधीचा भ्रष्टाचार,” शनिशिंगणापूर संस्थानचं ऑडिट होणार, शिंदे-फडणवीसांची मोठी घोषणा
हेही वाचा…“बाळासाहेबांना विचारलं तर कमरेत लाथ बसेल”, भरत गोगावलेंचं वादग्रस्त विधान, दानवेंनी घेतला समाचार