नागपूर : राज्यात मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. काही वेळा मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत जाळपोळही करण्यात आली. तर अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणात वित्तहानी झाली. यानंतर अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पंरतु यातून सरकार फक्त सुडाच्या भावनेने काही गुन्हे दाखल केले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर आज देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात किती गुन्हे मागे घेण्यात आले. ? याची माहिती दिली.
हेही वाचा…“शिंदेंना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाही”, माजी मुख्यमंत्र्यांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
मराठा आंदोलनातील खटले मागे घेण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर आता त्या घटनांमधून किती गुन्हे मागे घेण्यात आले. त्याची माहिती आज देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. मराठा आंदोलनादरम्यान एकूण ५४८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिस महासंचालकाच्या स्तरावर दाखल झालेल्या केसेस १७५, शासनाकडे शिफारस झालेल्या आणि शासनाने मागे घेतलेल्या केसेस ३२४, २ केसेस शासनाने अमान्य केल्या आहेत. न्यायालयातून प्रत्यक्ष मागे घेण्यात आलेल्या केसस २८६ आहेत. तर न्यायालयात २३ केसेस प्रलंबित आहेत आणि नुकसान भरपाई न दिल्याने प्रलंबित १० केसेस आहेत. यातून ९० टक्के कारवाई पुर्ण झाली आहे. काही केसेस अशा आहेत की ते कुठल्याही निकषात बसत नाहीत. त्यावर कुठलीही कारवाई त्यावर केली नाही. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“देवाच्या देवळात कोट्यावधीचा भ्रष्टाचार,” शनिशिंगणापूर संस्थानचं ऑडिट होणार, शिंदे-फडणवीसांची मोठी घोषणा
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांनी २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्याआधी मराठा आरक्षणावर फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलवून चर्चा केली जाईल. अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण कसं ढवळून निघणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना असे म्हणायचे, आता उबाठावाले कुत्तासोबत नाचतात,” शिंदे गटाचा हल्लाबोल
हेही वाचा…निवडणुकीआधी इंडिया आघाडीत बिघाडी; जागावाटपावरून काॅंग्रेस, तृणमूल काॅंग्रेस आणि आप आमनेसामने
हेही वाचा…“शाळा बंद झाल्या आणि बिअरचा खप १२ टक्क्यांनी वाढला”
हेही वाचा…मराठा आरक्षण लांबणीवर, रात्री एकनाथ शिंदेंचा फोन, मनोज जरांगे पाटील म्हणाले..
हेही वाचा…“शारीरिक हव्यासापोटी ३८ वर्षीय नराधमाचा ६४ वर्षीय महिलेवर ब’ला’त्का’र”, चित्रा वाघ महिलेसाठी रूग्णालयात धावल्या