मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतांना कोविड काळातील घोटाळ्यांची मालिका वाचली. आदित्य राज्याच्या कृपेने कोविड काळात टेंडर पाऊस पडला. त्यामुळे कोविड काळाती सर्व घोटाळे एक एक करून बाहेर काढणार, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना दिला आहे. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंना प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“आम्ही अदाणीला घाबरत नाही, भविष्यातही रस्त्यावर उतरून संघर्ष करू”, वर्षा गायकवाड कडाडल्या
खोटारडे राज्यकर्ते महाराष्ट्रात राज्य करत आहेत. ज्यांनी मुंबईत सर्वाधिक टेंडरबाजी केली, ते आमदार आणि स्थायी समितीचे अध्यक्ष त्यांच्या मागेच बसले होते. ज्यांनी कोविड काळात घोटाळे केले असा आरोप आहे ते सगळे टेंडरबाज लोक शिंदे गटात आहेत. आपण कोणाविषयी बोलतो याचं भान मुख्यमंत्र्यांना नसेल. असा टोला संजय राऊतांनी शिंदेंना लगावला. तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये कोविड औषध खरेदीसह अनेक विषयांत केलेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यांची चौकशी करावी, असं शिंदे गटातील आमदार चिमण आबा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे की नाही हे स्पष्ट करावं, हे पत्र माझ्याकडे आहे. यासंदर्भातील संबंधित व्यक्तीशी माझं बोलणं झालंय. असा दावाही राऊतांनी केलाय.
हेही वाचा…“आदित्य राजाच्या कृपने वरूण राजानं अक्षर:श टेंडरचा पाऊस पाडला” ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
दरम्यान, हा २७ कोटींचा घोटाळा आहे. या घोटाळ्यात तत्कालीन सिव्हिल सर्जनना निलंबित करण्यात आलंय. त्यांचे सर्व धागेदोरे गुलाबराव पाटलांपर्यंत पोहोचतात. हे त्यांच्या पक्षातील फुटीर आमदार चिमण आबा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळविले आहे. हेच लोक तुमच्या आजूबाजूला मांडीवर बसले आहेत. त्यामुळे तुमची मांडी चेपली आहे. चिमण आबा पाटलांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करा. मग मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांवर या. महापालिकेत नक्की काय घडलं. कोणामुळे घडलं. घडवणारे तुमच्या आजूबाजूला बसले आहेत. त्यांना तुम्ही कसं अभय दिलंय. आणि त्यांना वाचवण्याकरता कसे आरोप करत आहात, हे आम्ही सादर करू असा इशाराही त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनात १७ पैकी १२ विधेयके मंजूर ; मराठा आरक्षणावर तब्बल ३ दिवस चर्चा,” मुख्यमंत्र्यांची माहिती
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनात १७ पैकी १२ मंजूर विधेयके मंजूर ; मराठा आरक्षणावर तब्बल ३ दिवस चर्चा,” मुख्यमंत्र्यांची माहिती
हेही वाचा…भाजपचं ठरलंय..! शिंदे आणि अजित पवार कमळावर निवडणुका लढवणार; माजी मंत्र्यांचा मोठा दावा
हेही वाचा…सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रं देण्याचा वेग वाढवला, आतापर्यंत ‘इतके’ प्रमाणपत्राचं वाटप
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ युवा नेत्याने केली आत्महत्या ; आत्महत्या की घातपात संशय ? पुण्यात एकच खळबळ