कोल्हापुर : संसदेच्या परिसरात तृणमूल काॅंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अवमान करणारे वर्तन केले. याचे चित्रीकरण काॅंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केले. या नंदनीय कृती बद्दल बुधवारी भाजपने बिंदू चौकात निदर्शने केली. देशविरोधी इंडिया आघाडीचा धिक्कार असो, काॅंग्रेस सरकारचा धिक्कार असो, उपराष्ट्रपतींचा अवमान नही सहेगा, हिंदूस्थान जिंदाबाद अशा घोषणा देखील कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.
हेही वाचा…निवडणूक आयुक्तांची नियुक्ती येणार सरकारच्या हाती ; संसदेत महत्वाचं विधेयक मंजूर
यावेळी भाजपचे जिल्ह्याध्यक्ष विजय जाधव म्हणाले की, देशाच्या ७५ वर्षाच्या इतिहासात अशाप्रकारे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचा अपमान कधीही झाला नाही. काॅंग्रेसच्या हीन वृत्तीचा विचार या कृतीतून दिसून आला आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, सरचिटणीस डॉ.सदानंद राजवर्धन, हेमंत आराध्ये, भरत काळे, अतुल चव्हाण, प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, गिरीश साळोखे, अनिल कामत, संतोष माळी, हर्षद कुंभोजकर, सचिन तोडकर, दिलीप मेत्रानी आदी उपस्थित होते.
हेही वाचा…“अराजकता माजवणारे ३ कायदे पारित करायचे आहे म्हणून विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन”
दरम्यान, संसद भवनात विरोधी पक्षातील १४३ खासदारांचं निलंबन करण्याच्या निदर्शनात इंडिया आघाडीकडून निषेध व्यक्त करण्यात आला. दिल्लीतील जंतरमंतरवर विरोधी पक्षांकडून सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं.
READ ALSO :
हेही वाचा…“तुम्ही शब्द दिला म्हणून उपोषण सोडले पण आता..,”मनोज जरांगे पाटील भूमिकेवर ठाम
हेही वाचा…मुंबईत ३८ वर्षीय तरूणाचा ६४ वर्षीय महिलेवर ब’ला’त्का’र”, महिला आयोगाने आरोपीवर कारवाई करण्याचे दिले आदेश
हेही वाचा…“देशातील जनता सगळं पाहतेय, सरकारला याची किंमत मोजावी लागेल”; शरद पवारांना मोदींना इशारा
हेही वाचा…“आता थुकरट विश्वप्रवक्त्यांनी सगळ्या झालेल्या आरोपांसाठी..”संजय राऊतांवर शिंदे गटाचा हल्लाबोल
हेही वाचा…रामाचा बाजार मांडलाय, राम कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही; कुणी केली टीका ?