मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. यातच दिल्लीत पार पडलेल्या इंडिया आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तर राज्यात शिवसेना ठाकरे गट २३ जागा लढविणार असं विधान संजय राऊतांनी सांगितलं आहे. यातच राऊतांच्या दाव्याचं खंडन करणार नाही. परंतु जागा वाटपाबाबत काॅंग्रेस हायकमांडचं निर्णय घेईल, असं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा..विरोधी पक्षातील १४३ खासदार निलंबित, आता राहुल गांधींनाही आली नोटीस, काय आहे प्रकरण ?
काॅंग्रेस महाराष्ट्रातून इतक्या इतक्या जागा लढणार अशी बातमी होत असेल तर ती त्यांची मर्जी आहे. काॅंग्रेस कितीपण जागा लढवू शकते. परंतु इंडिया आघाडीच्या बैठकीअगोदर काॅंग्रेसच्या हायकमांडसोबत जागावाटपाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, वेणुगोपाल बैठकीत उपस्थित होते., यांच्यासमोर महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा वाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये जागावाटपाचा निर्णय मुंबईत नाही तर दिल्लीत होईल, असा निर्णय घेतला. यातच काही वर्षापासून आम्ही २३ जागा लढवत आहोत. त्यामुळे याही वर्षी २३ जागा लढविणार अशी चर्चा झाली आहे. असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“उपराष्ट्रपतींच्या अवमानाच्या निषेधार्थ कोल्हापुरात भाजपाची निदर्शने”,भाजपचे कार्यकर्ते आक्रमक
दरम्यान, लोकसभेसाठी काॅंग्रेसच्या उमेदवार निवडीला वेग आला आहे. काॅंग्रेसकडून राष्ट्रीय स्तरावर ५ सदस्यी समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती जागा वाटपाचा निर्णय घेणार आहे. समितीवर प्रादेशिक पक्षांसोबत जागावाटपाच्या वाटाघाटी करण्याची जबाबदारी देखील असणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा..पुण्यातील भाजपचे आमदार धास्तावले, ! रिपोर्ट कार्डमुळे झाली पंचाईत, गोंधळ, धाकधुक वाढली
हेही वाचा…बारामतीत ओबीसी कार्ड खेळण्याचा भाजपचा प्रयत्न ; सुळेंच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या व्यक्तीला दिली मोठी जबाबदारी
हेही वाचा…“संविधान पदावर निर्जीवर बाहुल्यांचा खेळ सुरू”,उपराष्ट्रपतींवर सामानातून जहरी टिका
हेही वाचा…“२४ तारीख अल्टिमेटम देऊ नका, अडचण आहे, पण आम्ही मार्ग काढू”, जरांगे सोबतची चर्चा निष्फळ
हेही वाचा…“कामापेक्षा शायनिंग जास्त, VIP मुळे जनता त्रस्त!” ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या उद्घाटनावरून ठाकरेंची टिका