नवी दिल्ली : संसदेत बाहेर निदर्शने करत असताना तृणमूल काॅंग्रेसचे खासदार बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांची मिमिक्री केली. अन् त्याचे चित्रण काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काढले. त्यावरून देशभरात सत्ताधारी भाजपकडून राहुल गांधींच्या विरोधात जोरदार टिका करण्यात आली. तर काही ठिकाणी भाजपकडून आंदोलने काढत निषेध व्यक्त करण्यात आला. आता यावरून सामानातून या घटनेवर जोरदार टिका करण्यात आली आहे.
हेही वाचा…मुंबईत ३८ वर्षीय तरूणाचा ६४ वर्षीय महिलेवर ब’ला’त्का’र”, महिला आयोगाने आरोपीवर कारवाई करण्याचे दिले आदेश
पदावरील बाहुल्यांनी अपमानाचा बाऊ करू नये, अशा आशयाची एक म्हण जर्मनीत आहे. आपल्या देशात या म्हणीचा प्रत्यत रोज येताना दिसतोय. देशावरचे हे संकटच म्हणावे लागेल. १९७५ साली देशावर आणीबाणी लादली तेव्हा लोकशाहीसाठी छाती पिटणारे जनसंघाचेच लोक होते, पण आज त्यांचा आत्मा मेला आहे. उघड्या डोळ्याने ते लोकशाहीचे दमन पाहत आहेत. मिमिक्री प्रकरण हे मूळ प्रश्नावरील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच आहे. संविधान पदावर निर्जीवर बाहुल्यांचा खेळ सुरू आहे. बाहुल्यांचे अश्रू खोटे असतात. असं टिका सामाना करण्यात आली आहे.
हेही वाचा…“देशातील जनता सगळं पाहतेय, सरकारला याची किंमत मोजावी लागेल”; शरद पवारांना मोदींना इशारा
दरम्यान, गेल्या दहा वर्षात देशाने व जनतेने असे अनेक अपमान सहन केले आहेत व त्या अपमानाची भरपाई होणे शक्य नाही. स्वत: च्या न झालेल्या अपमानाची रडारड करायची व इतरांची प्रतिष्ठा व स्वाभिमान पायदळी तुडवून मजा बघायची असे प्रकार सध्या सुरू आहेत. आपल्या न्यायालयाकडूनही आता कोणत्याच अपेक्षा ठेवता येतन नाहीत. सर्वच दिवे विझताना दिसत आहेत. अशा वेळी संसदेतील प्रश्न विचारणेही बंद झाले व देशात इदी अमिन पद्धतीचे राज्य सुरू होईल. संविधानाचा हा अपमान रोखण्यासाठी संविधानिक पदावरिल व्यक्ती काय पावले उचलणार आहेत ? असा सवाल देखील करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“२४ तारीख अल्टिमेटम देऊ नका, अडचण आहे, पण आम्ही मार्ग काढू”, जरांगे सोबतची चर्चा निष्फळ
हेही वाचा…“कामापेक्षा शायनिंग जास्त, VIP मुळे जनता त्रस्त!” ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या उद्घाटनावरून ठाकरेंची टिका
हेही वाचाविरोधी पक्षातील १४३ खासदार निलंबित, आता राहुल गांधींनाही आली नोटीस, काय आहे प्रकरण ?
हेही वाचा…“उपराष्ट्रपतींच्या अवमानाच्या निषेधार्थ कोल्हापुरात भाजपाची निदर्शने”,भाजपचे कार्यकर्ते आक्रमक
हेही वाचा…“तुम्ही शब्द दिला म्हणून उपोषण सोडले पण आता..,”मनोज जरांगे पाटील भूमिकेवर ठाम