पुणे : राज्यात सत्ताबद्दल होऊन महायुती स्थापन झाल्याने राज्यातील राजकीय गणितं बदलली आहेत. यातच आता आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढवणार असल्याने अनेकांची यामुळे गोची झाल्याचं दिसून येत आहे. यातच पुण्यात देखील भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये पुढील निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाणार की नाही ? यामुळे चांगलीच धास्ती भरली आहे. यातच आता विद्यमान आमदारांकडून त्यांचा रिपोर्ट कार्ड देखील मागितला असल्याने पुण्यातील महायुतीचे आमदार चांगलेच धास्तावले असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“उपराष्ट्रपतींच्या अवमानाच्या निषेधार्थ कोल्हापुरात भाजपाची निदर्शने”,भाजपचे कार्यकर्ते आक्रमक
पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ असून पाच मतदारसंघात भाजपचे, दोन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तर एक मतदारसंघ काॅंग्रेसच्या ताब्यात आहे. कोथरूडमध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्वती विधानसभा मतदारसंघात माधुरी मिसाळ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे, खडकवासला विधानसभा मतदारसंघात भीमराव तापकीर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सुनील कांबळे आमदार आहेत. तर वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे, आणि हडपसरमध्ये चेतन तुपे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार तर कसबा मतदारसंघात काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर आमदार आहेत.
हेही वाचा…“तुम्ही शब्द दिला म्हणून उपोषण सोडले पण आता..,”मनोज जरांगे पाटील भूमिकेवर ठाम
वडगाव शेरी आणि हडपसर हे दोन्ही मतदारसंघ भाजप आणि अजित पवार गटाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही मतदारसंघात मागच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अटीतटीची लढत झाली होती. वडगावशेरीत माजी आमदार योगेश टिळेकर आणि भाजपचे माजी शहाराध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक यांचा पराभव राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी पराभव केला. त्यामुळे याठिकाणी भाजपकडून या मतदारसंघावर आपला दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हडपसरमध्ये राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांनी भाजपचे योगेश टिळेकर यांचा अवघ्या २८२० मतांनी पराभव केला होता. त्यामुळे टिळेकर हेदेखील उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. याच ठिकाणी आता शरद पवार गटाकडून माजी शहाराध्यक्ष प्रशांत जगताप निवडणूकीच्या रिंगणार उभे टाकले आहेत. त्यामुळे तुपेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यातच वडगावशेरी किंवा हडपसर या दोन मतदारसंघापैकी एक मतदारसंघ सोडण्याची अजित पवार गटावर वेळ आल्यास त्यांता खडकवासला विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी हॅटट्रीक साधली होती. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांचा अवघ्या २५९५ मतांनी पराभव केला होता. त्यामुळे अजित पवार गटाकडून या जागेवर हक्का सांगितला जाऊ शकतो.
हेही वाचा…मुंबईत ३८ वर्षीय तरूणाचा ६४ वर्षीय महिलेवर ब’ला’त्का’र”, महिला आयोगाने आरोपीवर कारवाई करण्याचे दिले आदेश
दरम्यान, दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवड मधील आमदारांची अडचण काहीशी होणार नाही. कारण भोसरी विधानसभा मतदारसंघावर आमदार महेश लांडगे यांनी चांगलचं वर्चस्व गाजवलं आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर कुणीही संशय घेणार नाही. तर चिंचवड विधानसभेत माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला. यामतदारसंघात भाजपचं अतंर्गत राजकारण दिसून येतंय. परंतु पुढील निवडणुकीतही जगताप यांच्याच नावावर शिक्कामोर्तेब होण्याची शक्यता आहे. तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येईल. अशी चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बारामतीत ओबीसी कार्ड खेळण्याचा भाजपचा प्रयत्न ; सुळेंच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या व्यक्तीला दिली मोठी जबाबदारी
हेही वाचा…“संविधान पदावर निर्जीवर बाहुल्यांचा खेळ सुरू”,उपराष्ट्रपतींवर सामानातून जहरी टिका
हेही वाचा…“२४ तारीख अल्टिमेटम देऊ नका, अडचण आहे, पण आम्ही मार्ग काढू”, जरांगे सोबतची चर्चा निष्फळ
हेही वाचा…“कामापेक्षा शायनिंग जास्त, VIP मुळे जनता त्रस्त!” ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या उद्घाटनावरून ठाकरेंची टिका
हेही वाचाविरोधी पक्षातील १४३ खासदार निलंबित, आता राहुल गांधींनाही आली नोटीस, काय आहे प्रकरण ?