बारामती : आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने भाजपने आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. राज्यात महायुती म्हणून शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप मिळून एकत्रित निवडणुका लढविणार आहेत. तरीही भाजपने सावधगिरीचं पाऊल उचचलं आहे. यातच बारामतीत भाजपने ओबीसी कार्ड खेळण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा…“तुम्ही शब्द दिला म्हणून उपोषण सोडले पण आता..,”मनोज जरांगे पाटील भूमिकेवर ठाम
सुरूवातीपासून भाजपने बारामतीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिशन बारामती अभियान सुद्धा राबवलं आहे. यातच आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नवनाथ पडळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत मोठी खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. यावरून बारामतीत भाजपने ओबीसी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…मुंबईत ३८ वर्षीय तरूणाचा ६४ वर्षीय महिलेवर ब’ला’त्का’र”, महिला आयोगाने आरोपीवर कारवाई करण्याचे दिले आदेश
दरम्यान, नवनाथ पडळकर यांनी २०१९ मध्ये वंचितच्या तिकीटावर बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी सुप्रिया सुळे यांचा याठिकाणी मोठा विजय झाला तर नवनाथ पडळकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. यातच बारामतीत धनगर समाज मोठ्या प्रमाणात असून ओबीसींची संख्याही मोठी आहे. त्यामुळे नवनाथ पडळकर यांच्यामुळे भाजपला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“संविधान पदावर निर्जीवर बाहुल्यांचा खेळ सुरू”,उपराष्ट्रपतींवर सामानातून जहरी टिका
हेही वाचा…“२४ तारीख अल्टिमेटम देऊ नका, अडचण आहे, पण आम्ही मार्ग काढू”, जरांगे सोबतची चर्चा निष्फळ
हेही वाचा…“कामापेक्षा शायनिंग जास्त, VIP मुळे जनता त्रस्त!” ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या उद्घाटनावरून ठाकरेंची टिका
हेही वाचाविरोधी पक्षातील १४३ खासदार निलंबित, आता राहुल गांधींनाही आली नोटीस, काय आहे प्रकरण ?
हेही वाचा…“उपराष्ट्रपतींच्या अवमानाच्या निषेधार्थ कोल्हापुरात भाजपाची निदर्शने”,भाजपचे कार्यकर्ते आक्रमक