पुणे : शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणानंतर आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र याचिकेवर देखील सुनावणी सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांवरील याचिकेवर सुनावणी घेणार आहेत. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीत देखील दोन गट पडले. त्यामुळे दोन्ही गटाने आता याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रकरणाकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…राज्यात ठाकरे गट लोकसभेच्या ‘या’ २३ जागा लढविणार ; काॅंग्रेस हायकमांडसोबत झाली चर्चा
शिवसेना अपात्र आमदारांवरील याचिकेवर नुकतीच राहुल नार्वेकर यांनी सलग सुनावणी घेतली. त्याचा निकाल ३१ डिसेंबरपर्यंत अपेक्षित होता. परंतु निकाल वाचण्यासाठी राहुल नार्वेकरांनी कोर्टाकडे वेळ वाढवून मागितला आहे. त्यानुसार आता यावर १० जानेवारीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी प्रकरणावर आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत आता काय युक्तिवाद केला जाणार ? तेही पाहणं तितकेच महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा..पुण्यातील भाजपचे आमदार धास्तावले, ! रिपोर्ट कार्डमुळे झाली पंचाईत, गोंधळ, धाकधुक वाढली
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात अपात्र ठरतील, असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे येत्या १० जानेवारीला राहुल नार्वेकर या प्रकरणाबाबत काय निर्णय देणार त्याकडे लक्ष आहेच. यातच शिवसेनाप्रमाणे राष्ट्रवादीचीही सुनावणी नार्वेकर घेणार असून याही निकालाकडे लक्ष लागून राहणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार देखील अपात्र होणार का ? याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“विरोधकांच्या १४१ खासदारांना बाहेर ठेऊन मोठी चुक केली, किमंत चुकवावी लागणार,” शरद पवारांचा दिल्लीतून हल्लाबोल
हेही वाचा..शिंदेंचा ठाकरेंना पहिला दणका, सुजीत पाटकरांची १२ कोटी संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई
हेही वाचा…धुळ्याचा गड कोण जिंकणार ? भाजपसमोर काॅंग्रेसचं कडवं आव्हान, ठाकरेंचीही साथ मिळणार
हेही वाचा…“३ टन खिचडी, ट्रकभर केळी अन् चार लाख पाण्याच्या बाटल्या,” जरांगे पाटलांच्या सभेची जय्यत तयारी
हेही वाचा…काॅंग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात कोर्टानं ठरवलं दोषी