मुंबई : हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविड काळातील घोटाळ्यांची मालिका बाहेर काढली. त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटातील नेत्यांवर धडक कारवाई सुरू झाली आहे. कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजीत पाटकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून जवळपास १२ कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना पहिला झटका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
हेही वाचा…बारामतीत ओबीसी कार्ड खेळण्याचा भाजपचा प्रयत्न ; सुळेंच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या व्यक्तीला दिली मोठी जबाबदारी
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे ४६ वर्षीय सुजीत पाटकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने कोविड १९ जंबो सेंटर्स घोटाळ्यातील मनी लॉंड्रिंग्चाय चौकशीच्या संदर्भात पाटकरांची सुमारे १२ कोटी रूपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करणार असल्याची माहिती समोर आलीय. म्युच्युअल फंड युनिटस्, बॅंकेची खाती आणि ३ प्लॅट्स अशी एकूण १२.२ कोटींची संपत्ती इडी ताब्यात घेणार असून तीन फ्लॅट्सपैकी २.८ कोटींचा एक फ्लॅट हा सुजीत पाटकरांच्या नावावर असल्याची माहिती आहे. पाटकर यांना या प्रकरणी ईडीने या वर्षी जुलैमध्ये अटक केली होती. त्यांनी लाईपनलाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेसाठी निविदा मिळवून ३१.८४ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
हेही वाचा…“संविधान पदावर निर्जीवर बाहुल्यांचा खेळ सुरू”,उपराष्ट्रपतींवर सामानातून जहरी टिका
दरम्यान, भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सातत्याने याविरोधात आवाज उठवला आहे. सुजीत पाटकर आणि संजय राऊत यांच्यावर सातत्याने सोमय्या टिका करत असून कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. यासंदर्भात त्यांनी मुंबईत तक्रार देखील नोंदवली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…धुळ्याचा गड कोण जिंकणार ? भाजपसमोर काॅंग्रेसचं कडवं आव्हान, ठाकरेंचीही साथ मिळणार
हेही वाचा…“३ टन खिचडी, ट्रकभर केळी अन् चार लाख पाण्याच्या बाटल्या,” जरांगे पाटलांच्या सभेची जय्यत तयारी
हेही वाचा…काॅंग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात कोर्टानं ठरवलं दोषी
हेही वाचा…राज्यात ठाकरे गट लोकसभेच्या ‘या’ २३ जागा लढविणार ; काॅंग्रेस हायकमांडसोबत झाली चर्चा
हेही वाचा..पुण्यातील भाजपचे आमदार धास्तावले, ! रिपोर्ट कार्डमुळे झाली पंचाईत, गोंधळ, धाकधुक वाढली