नागपूर : संसदेच्या बाहेर तृणमूल काॅंग्रेसचे खासदार बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांची मिमिक्री केल्याने भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर विरोधी पक्षाच्या १४१ खासदारांचं निलंबण केल्याप्रकरणी इंडिया आघाडीने जंतर मंतरवर आज जोरदार आंदोलन केलं. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या आहेत.
हेही वाचा…काॅंग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात कोर्टानं ठरवलं दोषी
उपराष्ट्रपतीबाबत केलेलं कृत्य दुर्भाग्यपुर्ण आहे. विरोधकांनी देखील विरोधाची भाषा कुठतरी समजून घेतली पाहिजे. अटलबिहारी वाजपेयी मंत्री असताना घाटकोपरच्या इथे उद्घाटनासाठी बोलवलं होतं. त्यावेळी विरोधकांवर त्यांनी खोचक टिप्पणी केली होती. विरोधक इतका गोंधळ का करत आहेत. ?त्यांना आपली बाजू शांतपणाने सांगता येत नाही का ? खरोखरच विरोधी पक्षनेता म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी किती सुंदर भाषणं केली आहेत. त्यांच्या वागण्यात तितकीच जबाबदारी होती. आता खरंच सगळ्यांना याचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. अस नितीन गडकरी यांनी म्हटलं. लोकशाही गुणात्मक पद्धतीने पुढे न्यायाची असेल तर दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी करायला हवं असंही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…राज्यात ठाकरे गट लोकसभेच्या ‘या’ २३ जागा लढविणार ; काॅंग्रेस हायकमांडसोबत झाली चर्चा
दरम्यान, संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षातील जवळपास १४१ खासदारांचं निलंबण करण्यात आलं. त्यानंतर विरोधकांनी संसदेच्या बाहेर निदर्शने केलीत. यावेळी तृणमूल काॅंग्रेसच्या खासदाराने जगदीप धनगड यांची मिमिक्री केली. याचं चित्रण राहुल गांधींनी केल्याने भाजपने काॅंग्रेसच्या विरोधात आंदोलने केलीत. यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून आलंय.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीचे आमदार अपात्र होणार ? अजित पवार यांना दणका बसणार ?
हेही वाचा…“विरोधकांच्या १४१ खासदारांना बाहेर ठेऊन मोठी चुक केली, किमंत चुकवावी लागणार,” शरद पवारांचा दिल्लीतून हल्लाबोल
हेही वाचा..शिंदेंचा ठाकरेंना पहिला दणका, सुजीत पाटकरांची १२ कोटी संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई
हेही वाचा…धुळ्याचा गड कोण जिंकणार ? भाजपसमोर काॅंग्रेसचं कडवं आव्हान, ठाकरेंचीही साथ मिळणार
हेही वाचा…“३ टन खिचडी, ट्रकभर केळी अन् चार लाख पाण्याच्या बाटल्या,” जरांगे पाटलांच्या सभेची जय्यत तयारी