ठाणे : राज्यात शिवसेना पक्ष फुटीनंतर राजकीय वातावरण कमालीचं तापलेलं दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाने टिका केल्यानंतर त्यावर लगेचच ठाकरे गट प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे शिवसेनेती दोन्ही गटांमधील दरी वाढत चालली आहे. अशातच ठाण्यात एका विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाच्या वधूने शिंदे गटाच्या वराशी लग्नगाठ बांधली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह ठाकरे गटाचे नेतेही हजर होते.
हेही वाचा…धुळ्याचा गड कोण जिंकणार ? भाजपसमोर काॅंग्रेसचं कडवं आव्हान, ठाकरेंचीही साथ मिळणार
शिंदे गटाचे आमदार रविंद्र फाटक यांचे स्वीय सहाय्यक अजिंक्य गावकर आणि ठाकरे गटाच्या जिल्हा युवा समन्वयक आरती खळे यांचा विवाह सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रविंद्र फाटक, खासदार राजन विचारे वरूण सरदेसाई या विवाह सोहळ्यासाठी हजर होते. सकाळी मुख्यमंत्र्यांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली तर सांयकाळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी याठिकाणी वधु वरांना आशीर्वाद दिला.
हेही वाचा…“३ टन खिचडी, ट्रकभर केळी अन् चार लाख पाण्याच्या बाटल्या,” जरांगे पाटलांच्या सभेची जय्यत तयारी
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहिण जयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. या घरगुती सोहळ्यासाठी संपुर्ण ठाकरे कुटुंबीय मुंबईतील दादर येथे एकत्रित आलेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे देखील व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आले एकत्र, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचाउपराष्ट्रपतींची नक्कल..! नितीन गडकरींनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह विरोधकांना दिल्या कानपिचक्या
हेही वाचा…राष्ट्रवादीचे आमदार अपात्र होणार ? अजित पवार यांना दणका बसणार ?
हेही वाचा…“विरोधकांच्या १४१ खासदारांना बाहेर ठेऊन मोठी चुक केली, किमंत चुकवावी लागणार,” शरद पवारांचा दिल्लीतून हल्लाबोल
हेही वाचा..शिंदेंचा ठाकरेंना पहिला दणका, सुजीत पाटकरांची १२ कोटी संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई