पुणे : सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय राहणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं फेसबूक अकाऊंट पुन्हा एकदा हॅक झालं आहे. रोहित पवारांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. फेसबुक अकाउंट हॅक झाल्यानंतर रोहित पवार यांच्या फेसबुक प्रोफाईल फोटोला सिया राजपूत हे नाव दाखवत आहे. तर फेसबुकला सिया राजपूत असं नाव दाखवत आहे. त्यामुळे यावरून एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा..उपराष्ट्रपतींची नक्कल..! नितीन गडकरींनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह विरोधकांना दिल्या कानपिचक्या
रोहित पवार यांनी याबाबत ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. रोहित पवार यांचे फेसबुक पेजवर पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स असून आहेत. गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरु आहेत. आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं… या पेजवर चुकीचा मजकुर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं. याबाबत रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत. असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीचे आमदार अपात्र होणार ? अजित पवार यांना दणका बसणार ?
दरम्यान, रोहित पवार यांचं फेसबूक अकाऊंट हॅक झाल्यानंतर रोहित पवारांच्या समर्थकांनी कमेंटसचा पाऊस पाडला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांचं अकाउंट आणि पक्ष, घरातील माणसं हॅक केली आहेत. किती आदळआपट करत होता. साधं अकाऊंट सांभाळता येत नाही अन् महाराष्ट्र राज्य सांभाळण्याचे स्वप्न पाहत आहे. अशी खोचक कमेंट करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“आता पुरे झाली मन की बात, आता हवी जन की बात”, शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे मैदानात उतरणार
हेही वाचा…“जर रामराज्य आणायचं असेल तर भ्रष्टाचारामुक्त महाराष्ट्र घडवावा लागेल”, आदित्य ठाकरेंचं विधान
हेही वाचा…“कुठेही मॅच फिक्सिंग नाही, कुणालाही फसवणार नाही”, कार्यकर्त्यांना अजित पवारांनी दिला हा शब्द
हेही वाचा.शिंदे गटाचा वर, ठाकरे गटाची वधू..! ठाण्यात अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा, मुख्यमंत्र्यांसह ठाकरे गटाचे नेते उपस्थित
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आले एकत्र, राजकीय वर्तुळात एकच चर्चा