पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शरद पवारांची अनेकांनी साथ सोडली. अजित पवारांसह अत्यंत विश्वासू मानले जाणारे दिलीप वळसे पाटील देखील अजित पवारांसोबत गेलेत. यातच खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार शरद पवारांची खंबीर बाजू मांडताना दिसत आहेत. परंत यातच आता शरद पवारांचा आणखी एक नातू राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश, आघाडी अन् अपक्षाचे ५० माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल
अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार राजकारणात पदार्पण करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेचे युगेंद्र पवार आयोजक असून त्यांच्यावर बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांचे आता पोस्टर देखील झळकू लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…अटक होताच प्रकृती बिघडली, आमदारकीही जाणार ? काॅंग्रेसचे माजी मंत्री ‘सुनील केदार’ मोठ्या संकटात
दरम्यान, श्रीनिवास पवार उद्योजक असून त्यांचा शरयु ग्रुप आहे. हा ग्रुप कृषी, ऑटोमोबाईल, रियल इस्टेट, डिलरशीप आणि सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये कार्यरत आहे. श्रीनिवास पवार राजकारणापासून बाहेर राहतात. शरद पवार त्यांचे काका आहेत. परंतु आता त्याचा मुलगा युगेंद्र पवार राजकारणात येत असल्याच्या चर्चा आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“कुठेही मॅच फिक्सिंग नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो,” अजित दादांच्या या वक्तव्याचा काॅंग्रेसने घेतला समाचार
हेही वाचा…अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार? ‘या’ खासदाराचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हे शेतकऱ्यांसाठी मैदानात, ‘या’ मागण्यांसाठी चार दिवस आंदोलन करणार
हेही वाचा..सुप्रिया सुळेंचं लोकसभेतून निलंबन; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…“तुरूंगवास पत्करावा लागला तरी माफी मागणार नाही,” सुषमा अंधारेंचं उपसभापतींना संस्कृतमध्ये पत्र