सांगली : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.मागील एकही दिवसांमध्ये सांगली जिल्हा बँक मध्यवर्ती निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीत मोठा राजकीय राडा बघायला मिळाला. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. गोपीचंद पडळकर यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर त्यांनीच हल्ला करायला लावला असा गंभीर आरोप केला होता.
पुणे जिल्हा बँकेत प्रदीप कंदांच्या रूपाने भाजपची ऐतिहासिक विजयी सलामी
आता गोपीचंद पडळकर हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू सांगली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर यांच्यावर फसवणुकीसह ॲट्रोसिटीचा गुन्हा आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. विकत घेतलेल्या शेतजमिनीचे पैसे न दिल्याची फिर्याद शेतकरी महादेव अण्णा वाघमारे यांनी दिली आहे.
बारा तासांच्या तुरुंगवासानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराची सुटका; राजू कारेमोरे म्हणतात…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झरे येथील ज्येष्ठ शेतकरी महादेव वाघमारे आणि त्यांच्या बहिणीकडून आमदार पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मदेव यांनी २००८ मध्ये अकरा एकर शेतजमिनीचा (गट नंबर ६२४, ५५६ व ५५७/१) १० लाख ५० हजार रुपयांचा तोंडी व्यवहार ठरवून घेतला होता. यावेळी पडळकरांनी एक लाख रुपये दिले होते. त्यानंतर पुढील व्यवहार करत असताना पडळकर बंधूनी वाघमारेंना ४ लाख ७५ हजार रुपये दिले. व्यवहार १० लाख ५० हजारांचा ठरलेला असताना फक्त ४ लाख ७५ हजार रुपये देऊन बाकीच्या पैशांसाठी टाळाटाळ केली आहे. अखेर या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेऊन पडळकर बंधूंच्या विरोधात ॲट्रोसिटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आटपाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Read also:
- प्रदीप कंद यांच्या विजयाचे अजित पवारांनी एकदा आत्मपरीक्षण करावे; बाळा भेगडेंचा सणसणीत टोला
- जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले – देवेंद्र फडणवीस
- … अनाथांची मातृदेवता हरपली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली
- अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं निधन; पुण्यातील गॅलक्झी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
- सॉरी, सॉरी, सॉरी, सॉरी…; जितेंद्र आव्हाडांनी भाजप नेत्याची मागितली जाहीर माफी