IMPIMP
mns mns

‘कामगार कोणत्याही क्षेत्रातला असो’ कामगारांवर अन्याय झाला तर मनसे सदैव तत्पर

मुंबई : सॉफ्टवेअर क्षेत्रात अग्रगण्य स्थानी असलेली व्ही सॉफ्ट ही कंपनी महाराष्ट्र मधील नावाजलेल्या बँकांमध्ये अनेक वर्षांपासून सॉफ्टवेअर सेवा पुरावते, या कंपनी मध्ये काम करणाऱ्या कामगारांना वर्षानुवर्ष कोणत्याही प्रकारे पगार वाढवून देत नव्हते ,त्यांचे मासिक वेतन व त्यांचे भविष्यनिर्वाह निधीचे पैसे सुद्धा कंपनीने थकवले असून त्यांना अचानक पणे कामावरून सुद्धा काढण्यात आले.

सदर कंपनीने कामगारांना कोणतीही आगाऊ सुचना न देता टर्मिनेशन लेटर देण्यात आले. सदर कामगारांनी आज ०४/११/२०२० कामगार नेते मनकासे सरचिटणीस मा. श्री गजानन राणेसाहेब यांची भेट घेतली व त्यांना आपल्या समस्या मांडल्या, समस्यांवर तोडगा काढण्यासाठी गजानन राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मनकासे शिष्टमंडळ व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी जाणार आहे.

महाराष्ट्र मध्ये राहून मराठी कामगारांनाची कोण गळचेपी करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कंपनी व्यवस्थापनाला धडा शिकवेल असा इशारा यावेळी गजानन राणेसाहेब यांनी कंपनी प्रशासनाला दिला. सदर चर्चेस मनकासे उपाध्यक्ष निशांत गायकवाड़, चिटणीस राज पार्टे, प्रतीक राणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ मनोज चव्हाण आणि कार्याध्यक्ष संतोष धुरी यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान ०2 महिन्यांपूर्वी सैफी व्यवस्थापन, कंत्राटदार, युनियनचे पदाधिकारी यांची स्थानिक पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस कमिशनर यांच्या समोर झालेल्या बैठकीत कोरोना च्या कालावधीत कामावर येऊ न शकलेल्या कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु, केवळ कामगारांची उपासमार व्हावी म्हणून व्यवस्थापन आणि कंत्राटदाराने जाणीवपूर्वक कामगारांना कामावर घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत ह्यासाठी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुलंद आवाज श्री. गजानन राणे साहेब ह्यांच्या नेतृत्वाखाली सैफी इस्पितळ येथे आंदोलन आले.

तदनंतर सैफी इस्पितळाचे ट्रस्टी श्री. बपयी, आणि मेडिकल संचालक श्री. डिसा यांनी आज दुपारी कंत्राटदार सोबत कामगार सेनेची बैठक आयोजित करून कामगारांना कामावर घेण्यासाठी योग्य ती कार्यवाही करायचे आश्वासन दिले.

 

Read Also :

‘त्याच दिवशी मी शपथ घेतलेली, अर्णबला सोडणार नाही’

रोहित पवारांच्या यशासाठी ‘मातोश्रीं’नी कसली कंबर; ‘सुनंदा पवार’ उतरल्या मैदानात

व्लादिमिर पुतीन यांना गंभीर आजार , राष्ट्रपतीपद सोडणार ?

‘कराल काय स्वतःला अटक??? न्या स्वतःला फरफटत’ , राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

कोरोनाच्या पार्शवभूमीवर यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार?

“सैफी इस्पितळातील कामगारांच्या प्रश्नांवर जोपर्यंत ठोस निर्णय इस्पितळ प्रशासन घेत नाही, तोपर्यंत कायदा हातात घेत रहाणार” – गजानन राणे