मुंबई : महामारीमुळे इंटरनेटचा वापर आणि वापरकर्ते वाढलेले आहेत. परंतु, याचाच गैरवापर काही व्यक्ती करत असून, समाज माध्यमांवर खोट्या प्रोफाइल तयार करून लुबाडणूक करण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. यालाच एक राजकारणी आता बळी पडला आहे.
राज ठाकरेंच्या लाडका श्वान जेम्सचं निधन; अखेरचा निरोप देताना ठाकरे भावूक
मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करुन, त्यावरुन पैशाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याबाबत त्यांनी स्वत: फेसबुकवर पोस्ट करत, माहिती दिली आहे. याप्रकरणी जवळच्याच पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रारही दाखल केली असून, याबद्दल अधिक सांगताना, “फेसबुकवर खालील फोटो वापरून, माझ्या नावाने जे अकाऊंट आहे, ते हॅक झाले आहे. त्यावरून माझ्या नावाने,कोणीतरी पैशाची मागणी करत आहे, अशा कोणत्याही मागणीला कोणीही बळी पडू नका! माझे अकाऊंट अधिकृत आहे, याची नोंद घ्यावी,” असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच, “मित्रांनो आजकालच्या या टेकनॉलॉजीच्या युगात आपण खूप सावध असले पाहिजे. नुकतेच माझ्या नावाने विविध फेसबुक अकाऊंटवर काही भामटयांनी अनेकांना मेसेज करून पैसे मागितले. याबद्दल मी रितसर तक्रार नोंदविली आहे. पण कोणीही असो पैसे मागितल्यावर, कधीही कोणाच्याही नावाने मागितले तरी त्याला खात्री केल्याशिवाय अजिबात 1 दमडीही देऊ नये. ज्या 2 नंबर वरून ते मागितले गेले ते खालीलप्रमाणे”….
7376801541
8607892210
“सामान्य जनतेचे आपल्या नेत्यांवर प्रेम असते आणि या प्रेमापोटी तो कधी कधी अशा लबाडीला बळी पडू शकतो. परंतु आपणास विनंती आहे की आत्ताच नाही तर इथून पुढेही कधी असा प्रकार झाल्यास अशा मागणी करणाऱ्यास 1 रुपया हि आपण देऊ नये. आपली माझ्यावरील प्रेमा पोटी फसवणूक होऊ नये म्हणून आपणास या पोस्ट द्वारे ह्या सगळ्या बाबतीत सूचित करीत आहे. – आपला नम्र बाळा नांदगावकर,” अशी फेसबुक पोस्ट त्यांनी केली आहे.
Read Also :
- “होय! मी भक्त आहे! आणि याचा मला अभिमान आहे!”
- माझं वय झालयं, मी चौकशीला येवू शकत नाही; अनिल देशमुखांचे ED ला पत्र
- पुणे महापालिकेत अजित पवारांचा मनमानी कारभार; महापौर मोहोळांचा बैठकीतून पत्ता कट
- विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसला आमचा पाठिंबा; शिवसेना राष्ट्रावादी काँग्रेसने केला पुनरुच्चार
- अहमदनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांचा अर्ज दाखल