मुंबई : जगात अजूनही मोठ्या संख्येने महामारीने बाधित रुग्ण सापडत आहेत. भारतातही तिसरी लाट लवकरच येण्याचा धोका ‘टास्क फोर्स’ने दिला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून शक्य ती खबरदारी आणि योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करण्यात येत असून, गेल्या आठवड्याभरात लसीकरणाचा वेग वाढला असून, आकडेवारीनुसार भारतानं डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे.
“वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यँत लग्न करणार नाही, फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं?”
या पार्श्वभूमीवर, समाज मा”ध्यमांवर सक्रिय असणाऱ्या, माजी मुख्यमंत्री आणि सध्या राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी, ट्विटवर वर एक ट्विट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हाँ ! मैं भक्त हूँ !
और मुझे गर्व है ! pic.twitter.com/I9oA0C0ZQy— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) June 28, 2021
“होय! मी भक्त आहे! आणि याचा मला अभिमान आहे!” असं ट्विट त्यांनी केलं असून, त्यांनी ट्विटसोबत भारतात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी देखील दिली आहे. यानुसार, (आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार) देशात सर्वाधिक ३२,३६,६३,२९७ लसीचे डोस देण्यात आले असून, दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत आजपर्यंत सर्व प्रकारच्या लसींचे मिळून एकूण ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ डोस देण्यात आले आहेत.
“फडणवीसांवर विश्वास कसा ठेवणार? ‘तो अध्यादेश म्हणजे ओबीसींची फसवणूक”, खडसेंकडून हल्लाबोल
दरम्यान, २१ जूनपासून देशात १८ ते ४४ या वयोगटासाठी, केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी 83 लाख नागरिकांना लस देण्यात आली. आता भारतानं विक्रमी लसीकरण केलं आहे.
Read Also :
- माझं वय झालयं, मी चौकशीला येवू शकत नाही; अनिल देशमुखांचे ED ला पत्र
- पुणे महापालिकेत अजित पवारांचा मनमानी कारभार; महापौर मोहोळांचा बैठकीतून पत्ता कट
- विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसला आमचा पाठिंबा; शिवसेना राष्ट्रावादी काँग्रेसने केला पुनरुच्चार
- राज ठाकरेंच्या लाडका श्वान जेम्सचं निधन; अखेरचा निरोप देताना ठाकरे भावूक
- अहमदनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांचा अर्ज दाखल