मुंबई : वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने आज राज्यभरात युवासेनेच्या वतीने आंदोलन कऱण्यात आलं आहे. वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. शिंदे फडणवीस सरकारला साथ म्हणजे युवकांच्या रोजगाराला लाथ, आलीबाबा आणि 40 चोर दिल्लिश्वरांसाठी लावताहेत जोर अशा प्रकारचे पोस्टर देखील आज दाखवण्यात आलं.
“देवाचा कौल घेऊन भाजपात प्रवेश केला”; गोव्यातील काॅंग्रेस आमदाराचं वक्तव्य
महाविकास आघाडीचं सरकार असताना तेव्हा उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्या प्रकल्पासाठी जागा दाखवली. सर्व गोष्टी त्यावेळी करण्यात आल्या होत्या. परंतु जेव्हा राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं. त्यानंतर हा प्रकल्प गुजरातला गेला अशी टिका युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
“मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या पत्राचा विचार करावा”; सुप्रिया सुळे
युवासेनेच्या या आंदोलनावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेचं आज आंदोलन हे नाटक आहे, ज्यावेळेला मराठी मुलांच्या नोकऱ्या परप्रांतीय हिसकावत होते आणि मनसे महाराष्ट्र भर आंदोलन करत होती. राजसाहेबांना अटक झाली होती त्यावेळेला शिवसेना मूग गिळून गप्प होती. जेव्हा महाराष्ट्राच्या भल्याचा विषय येतो तेव्हां राजसाहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडलं नाही. त्यामुळे त्यांची चिंता सामना नी करू नये असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
“ही वेळ ‘एकदम ओक्के’ म्हणण्याची नसून कृती करण्याची आहे”; राष्ट्रवादीने शिंदेंना फटकारलं
दरम्यान, वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यात सध्या विरोधक आणि सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांनी रान पेटवलं आहे. अशातच या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील फोनवर चर्चा केली. वेदांत पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
Read also
- “उद्योगमंत्र्यांचा तरूणांनी राजीनामा मागितला पाहिजे”; वरूण देसाई
- “पहिल्याच अधिवेशनात दिलेले वचन मुख्यमंत्री पूर्ण करत नसतील तर..;” राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- “वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यामागे मोदी नाहीत”; वेदांतच्या अध्यक्षांचे स्पष्टिकरण
- “शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार, जर परवानगी मिळाली नाही तर..;”गुलाबराव पाटील
- “रशियावरून फडणवींसांचा फोन आला अन्…मला सांगितलं की..”; सांमंताचं वेदांत प्रकल्पावर मोठं वक्तव्य