गोवा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची चर्चा सुरू असताना गोव्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेगळं वळण लागलं आहे. गोव्यात काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दोन महिन्यापूर्वी गोव्यामध्ये ऑपरेशन लोट्स राबवण्यात अपयश आलं होतं, मात्र यावेळी भाजपची राजकीय खेळी प्रभावी ठरताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रसे नेत्याचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.
सेनेची जागा आता भाजप घेणार..! रिक्त झालेल्या जागेवर भाजपचा दावा, सेना-भाजपमध्ये रस्सीखेस
गोव्यातील काँग्रेसच्या 11 आमदारापैकी 8 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत, माजी विरोधी पक्षनेते मायकल लोबो, तसेच माजी मंत्री अलेक्स सिक्वेरा, यांच्यासह दिलायला लोबो, राजेश फळदेसाई, रूदाल्फ फर्नांडिस, लेक्स सिक्वेरा, केदार नाईक, संकल्प आमोणकर या आमदारांचा समावेश आहे.
मी देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी पुन्हा देवाचा कौल घेतला. मी देवापुढे माझे गाऱ्हाणे मांडले. सगळी परिस्थिती सांगितली. त्यावर देवाने मला तुला हवा तो निर्णय घे, मी तुझ्या पाठीशी असल्याचे सांगितले. त्यानंतर आपण भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असं आमदार दिंगबंर कामत यांनी सांगितलं आहे.
“राज्यात उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही?”; राज ठाकरेंनी शिंदे सरकारला फटकारलं
दरम्यान, गोव्यात एकुण विधानसभेच्या जागा 40 आहेत. यामध्ये भाजपने 20, काँग्रेसचे 11, एमजीपी 02, गोवा फॉरवर्ड पार्टी 01 व इतर 06 अशी सदस्य संख्या आहे. त्यामुळे आपलं सरकार अधिक मजबुत करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रयत्न करत असल्याचं याआधीही आपल्याला पाहायला मिळालं आहे. याच भाजपच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे.
Read also
- “मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या पत्राचा विचार करावा”; सुप्रिया सुळे
- “ही वेळ ‘एकदम ओक्के’ म्हणण्याची नसून कृती करण्याची आहे”; राष्ट्रवादीने शिंदेंना फटकारलं
- “काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केली, मात्र गोव्यात काँग्रेस छाडो यात्रा सुरू झाली आहे”; प्रमोद सावंत
- “लक्षात ठेवा…! राज्यात अस्सल हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे”; तुषार भोसले
- “माझी अक्कल काढली, तरी मला फारसं वाईट वाटत नाही”; पेडणेकरांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर