मुंबई : वेदांता फॉक्सकॉनचा पुण्यात होऊ घातलेला प्रकल्प अचानक गुजरातला स्थलांतरीत होत असल्याचं वृत्त मंगळवारी समोर आलं. वेदांत आणि फॉक्सकॉनच्या सेमी कंडक्ट हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं आहे.
“सांग सांग भोलानाथ हा बालिश प्रश्न शेलारांनी मुनगंटीवारांना विचारला पाहिजे”; सेनेचं प्रत्युत्तर
फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
“आरती सिंग दर महिन्याला वसुली करून पैसे ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या”; रवी राणांचा गंभीर आरोप
वेदांत आणि फॉक्सकॉनच्या सेमी कंडक्ट हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला जाण्याचा हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी करत. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.
पिस्तुल काढणं, सोडून द्या…अन्..”; आदित्य ठाकरेंचा वेदांत प्रकल्पावरून शिंदेंवर निशाणा
सोबतच, गेल्या दोन वर्षात वेदांत फॉक्सकॉन कंपनीला तत्कालीन सरकारकडून जसा प्रतिसाद मिळायला हवा होता, तसा तो कदाचित मिळाला नसेल, म्हणून कंपनीकडून हा निर्णय घेतला असावा. इतकेच नव्हे तर हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकार प्रयत्न करत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Read also
- संजय शिरसाठांना पुन्हा एकदा डावललं..! शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर
- “हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्ये व्यस्त, विरोधकही काही बोलत नाहीत”; राजू शेट्टी आक्रमक
- “पोलीस ठाण्यात जाऊन माझं काम मी इमानदारीनं केलंय”; नवनीत राणा
- “13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही”; किशोरी पेडणेकर
- “शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”