सांगली : उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू कर्नाटकला देवदर्शनासाठी आले. त्यानंतर ते विजापुरवरून जत तालुक्यातल्या लवंगामार्गे पंढरपुरला जात असताना सांगलत त्यांना मारहाण कऱण्यात आली. मुलं चोरणारी टोळी समजून त्यांना जमावाने चांगलीच मारहाण केली. त्यावरून आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. यातच भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी इशारा दिला आहे.
“हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्ये व्यस्त, विरोधकही काही बोलत नाहीत”; राजू शेट्टी आक्रमक
सांगलीत सहा साधूंना मारहाण केल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि निषेधार्थ आहे. या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुर्णपणे लक्ष्य ठेऊन आहेत. राज्यात अस्सल हिंदुत्वाद्याचं सरकार आहे. त्यामुळे समाज कंठखांना ठणकावून सांगतो की, तुम्हाला निश्चितपणे अद्दल घडणार आहे. यातच आता सांगलीच्या पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.
“पोलीस ठाण्यात जाऊन माझं काम मी इमानदारीनं केलंय”; नवनीत राणा
तसेच या प्रकरणाबाबत गुन्हा देखील दाखल झाला आहे. तसेय या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात देखील घेतलं आहे. तसेच अजून 10 ते 15 जणांना अटक होणार आणि कठोर शिक्षा होईल, असंही आश्चार्य तुषार भोसले यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये साधूसंतासोबत जी दुर्दैवी मारहाण झाली. त्याच्बरोबरच जो काही अभद्र प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत साधू संतांचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही. पालघर हत्याकांडात निर्दोष सांधूवर तत्कालीन फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने अन्याय केला. त्यांचा प्रखर हिंदू विरोध देशाने पहिला आहे. मात्र वर्तमान सरकार हे साधू संतांचा सन्मान करणारे सरकार आहे. दोषींना कठोर शासन केले जाईल असं भाजप नेते राम कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पंढरपुरकडे जाण्याचा रस्ता विचारले असता तरूणाला मुलं चोरणारी टोळी असल्याचा सांधूवर संशय आला. त्यानंतर त्या तरूणांनी ही सर्व माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर संपप्त ग्रामस्थांनी सांधूना गाडीतून बाहेर काढू बेदम मारहाण केली. त्यांना लाठी काठी आणि पट्ट्याने जबर मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Read also
- “माझी अक्कल काढली, तरी मला फारसं वाईट वाटत नाही”; पेडणेकरांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर
- सेनेची जागा आता भाजप घेणार..! रिक्त झालेल्या जागेवर भाजपचा दावा, सेना-भाजपमध्ये रस्सीखेस
- शिंदेंच्या बंडखोरीनंतर मोठा राजकीय भुंकप..! माजी मुख्यमंत्र्यांसह काॅंग्रेसचे 8 आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश
- “राज्यात उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही?”; राज ठाकरेंनी शिंदे सरकारला फटकारलं
- संजय शिरसाठांना पुन्हा एकदा डावललं..! शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर