मुंबई : शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टिका केली होती. नुसतं बावन्नकुळे आडनाव असून चालत नाही, तर डोक्यात पण काहीतरी असावं लागतं, असा टोमणा किशोरी पेडणेकरांनी लगावला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“पोलीस ठाण्यात जाऊन माझं काम मी इमानदारीनं केलंय”; नवनीत राणा
किशोरी पेडणेकर असतील किंवा चंद्रकांत खैरे असतील. शिवसेनेच्या नेत्यांची अवस्था सध्या फार वाईट आहे. जेव्हा जनाधार कमी होतो. माणसं तुटत जातात. संघटन कमी होत जातं. तेव्हा अशी वक्तव्य येतात. त्यामुळे असे लोक माझी अक्कल काढतील, बुद्धी काढतील. त्यामध्ये मला फारसं वाईट वाटत नाही. त्यांच्या पायाखालची वाळू निसटलेली आहे. येत्या काही दिवसांत एक वेळ येईल की त्यांना त्यांची अशी वक्तव्य बंद करावी लागतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
आगामी निवडणुकीच शिवसेनेचा एकही नेता शिवसेना पक्षासोबत नसेल. सेनेतील सगळे नेते शिंदे गटात येतील, असं वक्तव्य भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. यावरून शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला होता.
“शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”
सोबतच, नुसतं बावन्नकुळे अडनाव असून चालत नाही, तर डोक्यात पण काहीतरी असावं लागतं, असा टोमणा लगावाला आहे. गेलया काही दिवसांपासून शिंदे गटातील नेत्यांकडून हिंसक वक्तव्य येत आहेत. कुणी तंगडं तोडले, कुणी हात-पाय तोडले अशा धमक्या देत आहेत, त्यामुळे या सर्वांची तक्रार पोलिसांकडे करणार असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
Read also
- सेनेची जागा आता भाजप घेणार..! रिक्त झालेल्या जागेवर भाजपचा दावा, सेना-भाजपमध्ये रस्सीखेस
- शिंदेंच्या बंडखोरीनंतर मोठा राजकीय भुंकप..! माजी मुख्यमंत्र्यांसह काॅंग्रेसचे 8 आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश
- “राज्यात उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही?”; राज ठाकरेंनी शिंदे सरकारला फटकारलं
- संजय शिरसाठांना पुन्हा एकदा डावललं..! शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर
- “हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्ये व्यस्त, विरोधकही काही बोलत नाहीत”; राजू शेट्टी आक्रमक