पणजी : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात मोठा राजकीय भुंकप घडून आला होता. याचा मोठा फटका महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना बसला. तर विरोधी बाकावर असलेला भाजप पुन्हा एकदा सत्तेत आला. त्यानंतर गोव्यात देखील आता मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या असून गोव्यात काॅंग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने पुन्हा एकदा राजकीय ड्रामा बघायला मिळण्याची शक्यता आहे.
“शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”
गोव्यामध्ये काॅंग्रेसला योग्य नेतृत्व मिळत नसल्याने अनेक आमदार याअगोदर नाराज होते. दिल्लीतील काॅंग्रेसचे नेते अपयशी ठरल्याने गोव्यात विरोधी पक्षनेत्याची खुर्ची अनेक दिवसापासून रिक्त आहे. माजी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना विरोधी पक्षावरून पायउतार केल्यानंतर ती खुर्ची रिक्त झाली. त्याजागी अजूनपर्यंत कोणत्याही नेत्याची निवड कऱण्यात आली नाही.
“सांग सांग भोलानाथ हा बालिश प्रश्न शेलारांनी मुनगंटीवारांना विचारला पाहिजे”; सेनेचं प्रत्युत्तर
आज त्यामुळे गोव्यातील 11 आमदारांपैकी आज 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, तसेच नुवेचे काॅंग्रेस आमदात तथा माजी मंत्री अलेक्स सिक्वेरा, यांच्यासह इतर काही आमदारांचा समावेश आहे.
“आरती सिंग दर महिन्याला वसुली करून पैसे ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या”; रवी राणांचा गंभीर आरोप
दरम्यान, काही वेळात हे आठही आमदार विधानसभेतील सचिवाला भेटून आपला राजीनामा देणार आहेत. त्यामुळे याचा मोठा फटका काॅंग्रेसला बसणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून गोव्यात राजकीय भुंकप घडणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्याचाच परिणाम आज दिसण्याची शक्यता आहे.
Read also
- “राज्यात उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही?”; राज ठाकरेंनी शिंदे सरकारला फटकारलं
- संजय शिरसाठांना पुन्हा एकदा डावललं..! शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर
- “हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्ये व्यस्त, विरोधकही काही बोलत नाहीत”; राजू शेट्टी आक्रमक
- “पोलीस ठाण्यात जाऊन माझं काम मी इमानदारीनं केलंय”; नवनीत राणा
- “13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही”; किशोरी पेडणेकर