मुंबई : एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे प्रकरणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेने नेते संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे. जनाब राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय असा टोला चित्रा वाघ यांनी राऊतांना लगावला आहे.
बायको-सासुबरोबर जेलमध्ये जायचं का? प्रकाश आंबेडकरांची अशोक चव्हाणांना धमकी
चित्रा वाघ म्हणाल्या की, ”जनाब संजय राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे, हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे. कोकणातील वादळग्रस्तांना मोबादला मिळत नाहीये, शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. मराठाड्यात अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाहीये, आरोग्य विभागात घोटाळा होतोय, एमपीएससीच्या तरूणांचे भविष्य अंधारात ढकललं जातंय, रोज राज्यातील लहान मुली, महिला यांवर लैंगिक अत्याचार होतायत… या सगळ्या विषयांवरती आपल्याला भाष्य करायचे नाहीये. पण तुम्हाला NCB सारख्या स्वायत्त संस्थेतील एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरून टार्गेट करायचं, त्याच्यावर पर्सनल अटॅक करून त्याच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
सर्वज्ञानी जनाब संजय जी राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे ??
न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करते
जय हिंद.. pic.twitter.com/xfYTas4u0b— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 26, 2021
पुढे त्या म्हणाल्या की, नगरमध्ये ज्या हिंदूस्थानद्रोही लोकांनी पाकिस्तानच्या विजयाचा घोषणा दिल्या आणि त्यांना विरोध करणाऱ्यांचे डोके फोडले जातात आणि तुमची यंत्रणा मात्र उलट विरोध करणाऱ्यांवरच कारवाई करते यावर तुम्हाला बोलायचं नाही. कारण जनाब राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय. न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करते असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
Read Also :
- समीर वानखेडे यांच्या कुटूंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या; जीवाला धोका असल्याचा पत्नीचा दावा
- अखेर समीर वानखेडे यांचा करेक्ट कार्यक्रम; लवकरच बदली होणार?
- समीर वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितला, माझी मुलगी गुन्हेगार आहे काय? – नवाब मलिक
- पुणे महापालिकेत लोकसंख्येनिहाय नगरसेवकांची संख्या ठरणार? 166 ऐवजी 183 उमेदवार असणार!
- समीर वानखेडे लोकांच्या घरात ड्रग्स प्लांट करतो; NCB अधिकाऱ्याचं खळबळजनक निनावी पत्र