मुंबई : अमली पदार्थ विक्री व दलालीमध्ये नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर छापा टाकला आहे.
ड्रग्स प्रकरणात नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना काल अटक करण्यात आले होते. तब्बल 10 तासांच्या चौकशीनंतर खान यांनी एनसीबीकडून अटक करण्यात आले होते. आज त्यांच्या घरावर एनसीबीने धाड टाकली आहे.
Narcotics Control Bureau (NCB) is conducting multiple raids in Mumbai. After the arrest of one Sameer Khan yesterday, NCB intensified its investigation in the drugs case, multiple teams of NCB are conducting raids in Mumbai since last night: NCB
— ANI (@ANI) January 14, 2021
समीर खान यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने धाड टाकली. समीर खान यांच्या घरात एनसीबीकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. याबाबत टीव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे.
दरम्यान, नसीबीने शनिवारी करण सजनानी या ब्रिटीश अनिवासी भारतीयासह राहिला व शाईस्ता फर्निचरवाला, या दलाल बहिणींना अटक केली होती. त्यानंतर ‘मुच्छड पानवाला’चे सह मालक रामकुमार तिवारी यांना अटक केली होती. अधिक तपासात समीर खान यांचे नाव समोर आले होते.
Read Also :
- पुणे मेट्रोची वनाज ते गरवारे महाविद्यालय ट्रायल रन 15 ऑगस्टपूर्वीच, महापौरांनी दिली सुवार्ता
- ‘… तर मोदी आज आहेत त्यापेक्षा मोठे होतील’, सामनातून पंतप्रधानांना सल्ला
- ‘…तोपर्यंत मी बाबासाहेबांनी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार’
- तुकाराम मुंढेंची आता ‘या’ आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती
- सरपंचपदाचा लिलाव करणे पडले महागात, निवडणूक आयोगाने दिला दणका