मुंबई : नागपूर महापालिकेतील वादानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र काही दिवसातच ही बदली देखील रद्द करत त्यांना पोस्टिंगसाठी थांबविण्यात आले होते. आता अखेर पुन्हा एकदा मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या 15 वर्षांच्या सेवेमध्ये त्यांची ही 17वी बदली आहे. त्यांची प्रत्येक बदली वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे.
दरम्यान, मुंढेंसह आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
एमपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद कुमार यांची सहकार, मार्केटिंग आणि वस्त्रोद्योग विभाहाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डी.बी. गावडे यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त सचिवपदी नियुक्त करण्यात आली आहे. तसेच उदय जाधव यांची महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगामध्ये सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Read Also :
- सरपंचपदाचा लिलाव करणे पडले महागात, निवडणूक आयोगाने दिला दणका
- ‘राष्ट्राध्यक्ष कायद्यापेक्षा मोठा नाही’, ट्रम्प यांच्याविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव
- ‘30 वर्षांपूर्वी टेस्लाने महाराष्ट्राचा विचार केला असता, पण आता…’
- स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभाविपच्यावतीने ‘कोरोना योद्धा समर्पित’ बाईक रैली संपन्न
- ‘मलिक यांच्यावर ‘ड्रग माफिया’ असणाऱ्या जावयाला वाचवायची वेळ आलीये’, भाजप आमदाराची टीका