वॉशिंग्टन डीसी : डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीतील पराभव मान्य नसल्याने त्यांच्या समर्थकांनी अमेरिकन संसदेवर हल्ला केला होता. अमेरिकन लोकशाहीसाठी हा काळा दिवस ठरला होता. समर्थकांना हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे चिथावणीखोर भाषणं जबाबदार ठरली असा आरोप करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणण्यात आला होता.
डोनाल्ड ट्रंप यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह) संमत झाला आहे. सभागृहात 215 पेक्षा अधिक डेमोक्रेट आणि 5 रिपब्लिकन खासदारांनी याला समर्थन दिले आहे. महाभियोग चालवण्यासाठी 218 मतांची गरज होती.
215+ House Democrats, 5 House Republicans support impeaching US President Donald Trump (218 votes needed). House Majority Leader Hoyer says he would send articles of impeachment to US Senate immediately: NBC News
— ANI (@ANI) January 13, 2021
महाभियोग प्रस्तावाला दुसऱ्यांदा सामोरे जाणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. आता हा प्रस्ताव संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे सिनेटमध्ये पाठवला जाणार आहे. मात्र, सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडे बहुमत नाही.
तसेच, 25व्या घटना दुरुस्तीनुसार ट्रम्प यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील केली जात आहे. मात्र उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी यास नकार दिला आहे. 25वी घटना दुरुस्ती लागू करून ट्रम्प यांना आपण काढून टाकणार नाही. राज्यघटनेतील 25 वी दुरुस्ती ही अध्यक्षांना शिक्षा करण्याच्या उद्देशाने केलेली नाही, त्यामुळे ट्रम्प यांना काढून टाकण्यासाठी या तरतुदीचा वापर केल्यास चुकीचा पायंडा पडू शकतो, असे पेन्स यांनी म्हटले आहे.
Our president is not above the law.
Justice serves the people — it doesn’t protect the powerful.
— Joe Biden (@JoeBiden) January 9, 2021
दरम्यान, अमेरिकन राष्ट्रपती कायद्यापेक्षा मोठे नाहीत. न्याय हा सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आहे, कोणत्याही शक्तिशाली व्यक्तीच्या बचावासाठी नाही, असे ट्विट करत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावरील कारवाईचा इशारा दिला होता.
Read Also :
- ‘30 वर्षांपूर्वी टेस्लाने महाराष्ट्राचा विचार केला असता, पण आता…’
- स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभाविपच्यावतीने ‘कोरोना योद्धा समर्पित’ बाईक रैली संपन्न
- ‘मलिक यांच्यावर ‘ड्रग माफिया’ असणाऱ्या जावयाला वाचवायची वेळ आलीये’, भाजप आमदाराची टीका
- ‘घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवताय’, भातखळकरांचा नवाब मलिक यांना टोला
- … तर उद्धव ठाकरे आणि पवारांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा- चंद्रकांत पाटील