मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री यांच्या समर्थनार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज पासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आंदोलने करण्यात येतील. मुंबईतील चेंबुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
‘डर्टी डझन’ यादी घेऊन किरीट सोमय्या दिल्लीत! पत्रकार परिषद घेऊन आणखी बॉम्ब फोडणार
जयंत पाटील म्हणाले की, नवाब मलिक यांनी जवळपास सार्वजनिक जीवनात 30 वर्ष पूर्ण केली आहेत. केंद्र सरकारविरोधात बोलत असल्याने त्यांच्यावर झालेली कारवाई ही सुडाच्या भावनेने झाली आहे. नवाब मलिक यांचा आतंकवादाशी संबंध लावला आहे. ईडी, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणा ज्याप्रकारे काम करत आहेत, या सर्व कारवाया सुडाच्या भावनेतूनच होत असल्याचे महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
नाशकात शिवसेनेने भाजपला लावले सुरुंग! भाजपचे नेते मातोश्रीवर बांधणार शिवबंधन
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. यात युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, मनपाच्या गटनेत्या राखी जाधव, युवती प्रदेश उपाध्यक्षा सना मलिक आदींसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्येकर्त्यांचा समावेश होता. नवाब मलिक यांना इडीने ताब्यात घेतल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. तर आज तुरुंगात नवाब मलिक यांची अचानक तब्बेत बाहेर बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Read also:
- एसटी विलिनीकरणाच्या निर्णयाला मुहूर्त मिळेना; कोर्टाकडून सुनावणीला ‘तारीख पे तारीख’ सुरूचं
- बच्चू कडू बनले नायक चित्रपटातील हिरो; पंचेचाळीस हजार तक्रारी काढल्या निकाली
- नवाब मलिक यांची प्रकृती खालावली; ईडी कोठडीतून जे. जे. रुग्णालयात हालवलं
- …असा जावई शोध लावण्याऱ्यांना ‘भैय्या भूषण’ पुरस्कार द्या- राऊतांना मनसेचा टोला
- भाजप बुडाला आग लागल्यापासून…; किशोरी पेडणेकरांचा भाजपला टोला