मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील १२ नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यांनी ट्विट करून ‘डर्टी डझन’ असा उल्लेख करून त्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या नेत्यांची नावे घेऊन किरीट सोमय्या दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आता राज्यात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीचा दणका
किरीट सोमय्यांनी जाहीर केलेल्या नावांमध्ये अनिल परब, संजय राऊत, सुजीत पाटकर,भावना गवळी, आनंद अडसूळ,अजित पवार,हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, नवाब मलिक यांचा समावेश आहे. तर थोड्याच वेळात त्यांनी एक ट्विट करत यामध्ये यशवंत जाधव आणि किशोरी पेडणेकर यांच्या नावाचा देखील उल्लेख केला आहे.
शिवसेनेला अजून एक मोठा धक्का! यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागाचा छापा
किरीट सोमय्या दिल्लीत यासंदर्भात विविध अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. तसेच ते दिल्लीत पत्रकार परिषद देखील घेणार आहे. त्यामुळे त्या पत्रकार परिषदेत कुणावर काय आरोप करणार, कोणता राजकीय बॉम्ब फोडणार याकडे लक्ष लागुन आहे. शिवसेनेचे नेते आणि पालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकल्यानंतर इतर नेत्यांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Read also:
- खिशाला धनुष्यबाण लावणाऱ्या शिपायांवर देखील हे धाड टाकतील – संजय राऊत
- किरीट सोमय्यांनी समोर आणली नवीन ‘डर्टी फोर्टीन’ यादी; ‘या’ दोन नेत्यांची नावे आली नव्याने समोर
- बार्बाडोसमधून भगोड्या चोक्सीला भारतात न आणणारे दाऊदला कधी आणणार ? शिवसेनेची रोखठोक सवाल
- ज्यांना सोडून जायचं आहे, त्यांनी आताच जा नाहीतर..; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना इशारा
- नारी के सन्मान मै, शिवसेना मैदान मै; एकनाथ शिंदेंची उत्तर प्रदेशात गर्जना