मुंबई : आज सकाळीच मुंबईत शिवसेना नेते आणि मुंबई महानगरपालिका समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आगामी काळात मुंबई महानगरपालीचे निवडणूक असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे असा गंभीर आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. यशवंत जाधव यांच्या घरावर झालेल्या छापेमारीनानंतर शिवसेना नेते आता यशवंत जाधव यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी यशवंत जाधव यांचे समर्थन केले आहे आणि केंद्रीय यंत्रणांना टोमणे मारण्याचे काम केले आहे.
मुख्यमंत्री सहा महिन्यांपासुन बेपत्ता, आता मंत्री देखील कुणाला सापडणार नाहीत – चंद्रकांत पाटील
आगामी काळात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकांची प्रक्रिया पार पडत आहे आणि आता मला तर वाटतंय की मनपाच्या शिपायांवरही धाड टाकतील. कारण, काही मनपाचे शिपाई आहेत जे स्वतःच्या कपड्यांवर धनुष्यबाण लावतात अशी मला माहिती मिळालीय. मराठी लोक आहेत ते धनुष्यबाण लावतात आता त्यांनाही अटक होऊ शकते. सध्या राजकीय फायद्यासाठी केंद्र सरकार तर्फे महाराष्ट्रात उलथापालथ घडवून आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सर्रासपणे सुरु आहे. डर्टी पॉलिटिक्स आणि डर्टी पॉलिटिक्स करणारे भाजपचे ट्वेल आहेत.
संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीचा दणका
भाजपचे नेते खोटे गुन्हे दाखल करतात. खोटे पुरावे तयार करतात. मात्र आता मी सांगतो की सध्या जे काही सूर आहे ते आपल्याला २०२४ पर्यंत सहन करायचं आहे. हे महाराष्ट्राला सहन करायचं आहे. हे पश्चिम बंगालला सहन करायचं आहे. झारखंड, छत्तीसगढ आणि पंजाबलाही २०२४ पर्यंत सहन करायचं आहे. २०२४ नंतर सगळ्या गोष्टींची व्याजासहित परतफेड होईल असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे.
Read also:
- किरीट सोमय्यांनी समोर आणली नवीन ‘डर्टी फोर्टीन’ यादी; ‘या’ दोन नेत्यांची नावे आली नव्याने समोर
- बार्बाडोसमधून भगोड्या चोक्सीला भारतात न आणणारे दाऊदला कधी आणणार ? शिवसेनेची रोखठोक सवाल
- ज्यांना सोडून जायचं आहे, त्यांनी आताच जा नाहीतर..; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना इशारा
- नारी के सन्मान मै, शिवसेना मैदान मै; एकनाथ शिंदेंची उत्तर प्रदेशात गर्जना
- शिवसेनेला अजून एक मोठा धक्का! यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागाचा छापा