मुंबई : शिवसेनेचे नेते आणि पालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मत व्यक्त करताना शिवसैनिकांना कोणताही अनुचित प्रकार करू नये असे सांगितले आहे.
नारी के सन्मान मै, शिवसेना मैदान मै; एकनाथ शिंदेंची उत्तर प्रदेशात गर्जना
यशवंत जाधव यांच्या घरावर सकाळीच आयकर विभागाने छापा टाकल्याने किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आयकर विभागाने छापा टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्या सगळ्या तपास संस्था संविधानाला मानुन काम करीत आहेत. त्यामुळे यशवंत जाधव त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. परंतु शिवसैनिकांनी कोणताही अनुचित प्रकार करू नये, असं आव्हान पेडणेकर यांनी केले.
शिवसेनेला अजून एक मोठा धक्का! यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागाचा छापा
आज ज्या पद्धतीने राज्यात केंद्रीय तपास यंत्रणा काम करीत आहेत. ते सर्व महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. ज्याठिकाणी भाजपची सत्ता नाही, तिथे त्या लोकांना त्रास दिला जात आहे, म्हणून आम्ही शांत बसणार नाही. जे सर्व दुधाने धुतलेले आहे आणि महाविकास आघाडीतील नेते बरबटलेले आहेत, असे त्यांचे म्हणणं आहे. आम्ही कायदा मानतो उगाच वातावरण बिघडू नका, असं त्या म्हणाल्या.
ज्यांना सोडून जायचं आहे, त्यांनी आताच जा नाहीतर..; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना इशारा
अगोदर शिवसैनिक असलेल्या छगन भुजबळ यांना ज्या पद्धतीने त्रास झाला, परंतु त्यांनी शेवटपर्यंत लढत दिली. अखेर न्यायालयाने त्यांना क्लिन चिट दिली. सगळं स्पष्ट होऊन बाहेर येईल. नाही निवडणुकीच्या तोंडावर आणि सत्ता गेल्यापासून बुडाला आग लागली आहे हे महाराष्ट्र आणि मुंबई बघत आहे. असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
Read also:
- नाशकात शिवसेनेने भाजपला लावले सुरुंग! भाजपचे नेते मातोश्रीवर बांधणार शिवबंधन
- ‘डर्टी डझन’ यादी घेऊन किरीट सोमय्या दिल्लीत! पत्रकार परिषद घेऊन आणखी बॉम्ब फोडणार
- खिशाला धनुष्यबाण लावणाऱ्या शिपायांवर देखील हे धाड टाकतील – संजय राऊत
- किरीट सोमय्यांनी समोर आणली नवीन ‘डर्टी फोर्टीन’ यादी; ‘या’ दोन नेत्यांची नावे आली नव्याने समोर
- बार्बाडोसमधून भगोड्या चोक्सीला भारतात न आणणारे दाऊदला कधी आणणार ? शिवसेनेची रोखठोक सवाल